Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन,तालुका विधी समितीचा उपक्रम...


प्रतिनिधी/सोयगाव
>>>>>>>>>>>>>

येथील सोयगाव दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे शनिवारी (ता.१३) आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोक न्यायालयात आपसातील न्यायालयात प्रलंबीत खटले मिटण्याजोगे प्रकरणे,
फौजदारी प्रकरणे, बॅकधनादेशाची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बँक,ग्राम पंचायती,बीएसएनएल, एमएसईबी,यांची दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेण्याचे आवाहन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश अमोल भा. इंगोले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या