Advertisement

Responsive Advertisement

गंगापुर खुलताबाद तालुक्यात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा राबवणार- आ. प्रशांत बंब

गंगापुर प्रतिनीधी.गंगापुर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील लक्ष्मीनारायण लाॅन्स येथे रविवारी गंगापुर - खुलताबादचे आ.प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना ध्वजसंहितेचे नियम व अटी बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी आमदार बंब यानी इंतभूत माहिती उपस्थित नागरिकांना दिली.
                    दरम्यान यानंतर आ.प्रशांत बंब यानी उपस्थित आरीत व आदर्श फॉडेशनच्या सदस्यांना घर तिथे योजना व गाव तिथे विकास या कार्यक्रमांतर्गत विविध शासकीय योजनाची गंगापुर-खुलताबाद तालुक्यातील अंमलबजावणीसाठी तीनदिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे त्या प्रशिक्षणार्थ्याहीं आ.बंब यानी संबोधित केले यावेळी यां विद्यार्थ्यांनीही आमदार महोदयांना प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांचीही उत्तरे बंब यानी दिली. यावेळी एका विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाविषयीं प्रश्न विचारला असता आमदार बंब यानी सांगितले कीं मुळात या शिक्षकांना कायद्याने नेमणूकीच्या गावातच राहण्याची सक्ती आहे मात्र हे शिक्षक गावात न राहता शहराच्या ठिकाणी वास्तव्यास राहतात व बोगस कागदपत्रे जोडून घरभत्ता उचलतात त्यावर गावाचेही लक्ष असायला हवे तरी कोणी आवाज उचलला तर शिक्षक आमदार त्यांच्यावरची कारवाई टाळण्यासाठी दबाव आणतात त्यामुळे शिक्षक आमदार ही संकल्पनाच रद्द करायला हवी व शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याने त्यांनी गावातच राहावे जेणेकरून शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल व मुले व्यसनमुक्त राहतील असे आ.बंब यांनी भाषणात सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या