Advertisement

Responsive Advertisement

२४६ ज्येष्ठांनी केला लालपरी ने मोफत प्रवास...

सोयगाव/विजय पगारे
°°°°°°°°°°°°°°°°°°°°
    राज्य शासनाने ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा केली . रविवार पर्यंत औरंगाबाद विभागाच्या सोयगाव बस आगाराच्या बस मध्ये ७५ वर्षांवरील २४६ ज्येष्ठांनी लालपरी ने प्रवास केल्याचे प्रशासनाने माहीत दिली.
एसटी महामंडळाच्या सोयगाव आगाराच्या शुक्रवारी - २६ , शनिवारी - ९९ , तर रविवारी - १०६ दुपारच्या २:०० प्रर्यंत ७५  वर्षांवरील एकुण=२४६ ज्येष्ठांनी लालपरी म्हणजे एसटी बसमधून मोफत प्रवास केला .या योजनेचा बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान शुभारंभ झाल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे.
 या मोफत बस प्रवासासाठी नागरिकांना आधार कार्ड , पॅन कार्ड वाहन परवाना , निवडणूक ओळखपत्र किंवा केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे .
ही सवलत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत असणार आहे. औरंगाबाद विभागाचे सोयगाव बस आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या