Advertisement

Responsive Advertisement

जरंडीगावात सर्व सुविधाच सुविधा काहीच कुठे जाण्याची गरज नाही..जिल्ह्या तील एकमेव आदर्श स्वयंपूर्ण जरंडी -पोलीस निरीक्षक अनमोल केदार

   
   सोयगाव/विजय पगारे
अबब! जरंडीगावाला सर्व सुविधाच सुविधा ! ,कुठेच जाण्याची गरज नाही...असे उदगार सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी शुक्रवारी ता.०६ जरंडी ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या त्यावेळी ते जरंडी गावावर खुश होत बहोत खूब असे म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.

   जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विक्रमी वृक्षलागवड मोहीम,जेष्ठ नागरिकांचा कक्ष,गावाच्या सुरक्षेसाठी गावात सी.सी.टी.व्ही कॅमेरे,आदी उपक्रम राबवून गावाचा कायापालट केला यासाठी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी जरंडी ग्राम पंचायतीला भेट देवून गावाच्या सुरक्षेसाठी व पोलिसांच्या मदतीसाठी राबविण्यात आलेल्या गावभर सी.सी.टी.व्ही कॅमेरा उपक्रमाचे कौतुक केले आहे,गावाच्या प्रत्येक कोपरा या कॅमेऱ्यात कैद झालेला असून रात्रीचा फायदा घेत काही अज्ञातांना या उपक्रमाचा धसका बसला असल्याचे सांगून जरंडी गाव सोयगाव पोलिसांचे पोलीस मित्र झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सरपंच वंदनाताई पाटील,राजेंद्र पाटील,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,ग्राम पंचायत सदस्य मधुकर पाटील,ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे,उपनिरीक्षक सतीश पंडित,पोलीस शिपाई रवींद्र तायडे,लिपिक संतोष पाटील,बालू तात्या,सिद्धार्थ मोरे,श्रीराम चौधरी,विजय चौधरी,आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या