Advertisement

Responsive Advertisement

नुतन माध्यमिक विद्यालय खरवली च्या मंथन पेणकर चा वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक - मंथन च्या यशाचे सर्वत्र कौतुक

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्था मर्यादित पेण यांच्या माध्यमातून भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत माणगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्रात सुलौकीक असलेल्या खरवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन माध्यमिक विद्यालय खरवली या विद्यालयाचा पेण तर्फे तळे या गावातील इयत्ता सहावी मधील विद्यार्थी कुमार मंथन कृष्णा पेणकर  याने लहान गटात द्वितीय क्रमांक प्राप्त करून आपल्या पेणकर कुटुंबाचे तसेच पेण तर्फे तळे गावासह खरवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या नुतन माध्यमिक विद्यालय खरवली या विद्यालयाचे नाव रोशन केले आहे.
     सदर वकृत्व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने दोन गटात घेण्यात आली होती. मंथन कृष्णा पेणकर या विद्यार्थ्याने सदर वकृत्व स्पर्धेत उत्तम प्रकारे वाक्चातुर्य दाखवून    द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यास रोख रक्कम पंधराशे रुपये १५००/ रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. मंथन कृष्णा पेणकर याने प्राप्त केलेल्या यशाबद्दल नुतन माध्यमिक विद्यालय खरवली चे विद्यमान मुख्याध्यापक मा. विनायक गुळवणी सर, या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ एडवोकेट महेंद्र जी मानकर साहेब, मार्गदर्शक शिक्षक महेंद्र जंगम सर , तसेच नुतन माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व या शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून मंथन पेणकर चे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या