Advertisement

Responsive Advertisement

बाबरगावात जमीनीत अस्थिविसर्जन करुन पर्यावरण लोक चळवळीस सूरुवात ,गंगापूर -तालूक्यातिल बाबरगावचे जेष्ठ नागरिक हरीश्चंद्र पठाडे यांचे दिर्घ आजाराने निधन झाले त्यांचे स्मृति मातीशी एकरुप राहावे म्हनून मातृभूमितच चिरशांती मिळावी व त्यांची आयुष्यभर स्मृती टीकून या मातीत राहावी. आयुष्याच्या शेवटी अस्थी दुसरीकडे विसर्जन योग्य वाटत नाही  म्हणून सर्व नाते संबंधित परिवार यांच्या मान्यतेने व  उपस्थितीत त्यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपण करुन ही पृथ्वी सर्वांची गरज भागवू शकते, परंतु कूणा एकाची हाव भागवू शकत नाही म्हनून पर्यावरण रक्षण होणे काळाची गरज आहे.हे महात्मा गांधीचे बोल समाजासमाजात सत्यात उतरणे गरजेचे आहे. यासाठी गंगापूर तालूक्यातिल महात्मा गांधी तंटामूक्त गावचा पूरस्कार पटकावलेले बाबरगाव चे तंटा मुक्ती अध्यक्ष अरुण पठाडे यांचे वडील कै.हरीश्चंद्र मोहनराव पठाडे यांचे वडीलांचे दिर्घ आजाराने दूखःद निधन झाले त्यांच्यावर शेतातच अंत्यसंस्कार करुन त्यांच्या अस्थि  गंगेत न टाकता शेतात खड्डा करुन त्यावर वृक्षरोपण करुन अस्थिविसर्जन करण्यात आले. असे उपक्रम खेड्यात प्रत्येकाने राबवून नदिचे होणारे प्रदूषण थांबवावे असे आवाहन करण्यात आले.खेड्यातिल लोकांची माणसिकता या विषयी सकारात्मक व्हावी त्याची सूरुवात लोकांना सांगून होणार नाही तर ती स्वतः पासून सूरुवात करावी  त्यानंतर याचे गांभीर्य लक्षात येते म्हनून या उपक्रमाला आम्ही आमच्या भाऊबंध तसेच नातेवाईक यांना विश्वासात घेवून हा वीधी पार पाठला कारण आजच्या परीस्थितित परदेशात नदि पाण्याच्या दूर्भिक्षयामूळे आटत आहे,पर्यावारणाचे जतन होण्याएवजी प्रदूषणात दिवसेंदिवास वाढ होत आहे.शिवाय अनेकाअनेक कर्मकांड वाढत आहे या सर्वांवर उपाय व्हावा हा स्पष्ट हेतू समोर ठेवून असे उपक्रम राबवला आहे.असे उपक्रम गावागावातून व्हावे व ही लोकचळवळ व्हावी अशी मनस्वी इच्छा आहे असे अप्पासाहेब पठाडे,व अरुण पठाडे यांनी सांगितले .तीर्थ आणि क्षेत्राचं जलप्रदूषण पासून मुक्त होण्यासाठी आपल्याला मदत होईल समाजामध्ये एक चांगल्या विचाराचा आणि स्तुत्य कृतीचा संदेश जाईल याबद्दल "ह.भ.प.काकासाहेब महाराज गणगे,(सातारा परीसर छत्रपती नगर ) यांनी पठाडे परिवार व नातेवाईकांचे कौतुक केले व सांगितले की अशा माध्यमातून समाजजागृति होईल व समाजातील कर्मकांड आणि अनिष्ठ असलेल्या प्रथां यांना मूठमाती मिळेल " असा संदेश दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या