Advertisement

Responsive Advertisement

बैल पोळ्याच्या निमित्ताने वेळुची काठी खरेदीसाठी शेतकऱ्यांनची उसळली होती गर्दी...


सोयगाव/विजय पगारे
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
सोयगाव तालुक्यातील गावागावात शुक्रवारी (ता. २५) पोळा सन किरकोळ वाद वगळता उत्साहात साजरा करण्यात आला.  
 सकाळ पासून सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विहीर,नदी - नाल्यांवर जीततिथ पाण्याची मुबलकता होती त्या ठिकाणी बैलजोडी चे स्नान,साज सजावट करतानां शेतकरी दिसुन येत आला, सर्जा राज  वर्षभर शेतात राब राब करुन शेती उत्पन्नात मोलाचा हातभार लावत असतो, त्यामुळेच देशातील नागरिकांना धान्य पोटाला पोटभरून मिळते, त्यामुळे जगाचा पोशिंदा बैलाची पोळा या सनाला कृतज्ञता व्यक्त करण्याची पध्दत पूर्वी पासुन चालत आलेली आहे. मात्र पोळ्या सना निमित्ताने वेळुची काठीला  साळसुळ करुन व्यवस्थीत मोज माप करुन त्या काठीला आरु - छबी बसवून जवळपास एक काठी पन्नास रुपये प्रमाणे विक्री करून जवळपास जवळपास चारशे ते पाचशे वेळुच्या काठ्यांची विक्री बाजार चौकात  करण्यात आली. 
यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी काठी खरेदीसाठी झुंबड उडाली होती,  फार मोठी गर्दीसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
बैल पोळ्याच्या सना निमित्ताने वर्षे भर आपल्या खांद्यावर जुवाचे औझे घेऊन आपल्या धन्याच्या घरात धन धांन्याचे कोठार भरुन एक दिवस विश्रांती मिळावी म्हणून अनेक वर्षापासून पोळा हा सण साजरा केला जातो.
परंतु त्यादिवशी देखील अनेक शेतकरी गोडधोड पदार्थ व नैवैद्य आपल्या सरज्या राज्याला नवैद देतात तर काही शेतकरी मात्र आपल्या शेतात दैनंदिन वर्ष भर राब राब राबणाऱ्या नंदी राज्याला मात्र गोडधोड पोळीचा नैवेद्य न दाखविता हातात लांबलचक काठी घेऊन रक्त भंबाळ करतात तेव्हा अश्या पवित्र श्रावण महिन्यात अखंडपणे वर्षानुवर्षे चालत आलेली पोळा या सनाची पंरमपंरेचा आदर व सन्मान पुर्वक व विना काठीचा पोळा हा बैलांचा सण साजरा करायला हवा होता. 
ज्या प्रमाणे कुटुंबाचा उदरनिर्वाह  चालविण्यासाठी किंबहुना भागविण्यासाठी  पती पत्नीची काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो तीच जोडी असते.
 तशीच नंदीराज सरज्या राज्याचा हात भार उत्पन्न काढण्यासाठी असतो तरीदेखील काही शेतकरी बांधव गुण्यागोविंदाने पोळा हा सण साजरा करतात.
 तर तळीरामनी मात्र बैलपोळ्याच्या दिवशी दारुच्या नशेत तर्रर होऊन हातात काठी घेऊन  आपल्या सरज्या राज्याला बैलांना रक्तबंबाळ होई पर्यंत बदाडलं.
 अश्या काही शेतकरी बांधवांनी त्या म्हणणेच पोळ्याच्या निमित्ताने तरी हातात काठी न घेता बैलपोळा साजरा करायला हवा होता .
तरी देखील काही शेतकरी बांधव पोळयाच्या निमित्ताने अश्या पद्धतीने लाठ्या काठ्या खरेदी करतात तेव्हा व पोळ्याच्या दिवशी असंख्य शेतकरी बांधव मुक्या जनावरांना मारझोड करणात  दिसले तेव्हा याकडे संबंधित  जबाबदार अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी यांनी शासन प्रशासन करत्यानी का लक्ष दिले नाही. ? लक्ष का देऊ नये असा सवाल सुजान नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तेव्हा अश्या  पवित्र पोळ्याच्या सनाच्या दिवशी  तरी काठी लाठी खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील प्रसासनाने तंबी देऊन विणा लाठी काठी हातात न घेता बैलपोळा सन साजरा करण्यासाठी समज द्यायला हवी अशी मागणीने जोर धरला तेव्हा या मागणी संबंधित जबाबदार अधिकारी यांनी जातीने लक्ष देवून भविष्यात असा प्रकार थांबवावा अशी मागणी  मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था संस्थासह सुजान नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मत व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या