Advertisement

Responsive Advertisement

बाजार सावंगी येथे पुरात वाहुन गेलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला

 प्रतिनिधी समीर शहा

 
 

खुलताबाद -तालुक्यातील बाजार सावंगी येथे काल गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बाजार सावंगी येथील धांड नदीला मोठ्या प्रमाणात पुर आले होते ताजनापुर व बाजार सावंगी ला जोडनारे पुल धांड नदीच्या वर आहे नदीला मोठ्या प्रमाणात पुर असल्याने यातायात ठप्प झाली होती 

गुरुवारी संध्याकाळी 5 वाजाच्या दरम्यान ताजनापुरला जाणाऱ्या पुलावरून  बाजार सावंगी येथील तरुण भाऊसाहेब कारभारी नलावडे वय 32 वर्ष ताजनापुर कडे जात असतांना  पुरात वाहुन गेला होता पाण्याचा वेग जास्त असल्या मुळे पुलावरून थोड्याच अंतरावर तो वाहत पाण्यात बुडुन गेला भाऊसाहेब ला पोहता येत असतांना पाण्याच्या वेगा मुळे व नदीच्या खोलीकरन झाले असल्याने त्याठिकाणी खोल खड्ड् होते  तो खोल खंड्यतील गाळात जाऊन फसल्याने तरुणाला काही करता आले नाही व आखेर तरुणाने आपले प्राण गमावले 

या घटनेची माहीती अग्निशामग दलाला मिळताच आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घटनास्थळी अग्नीशामग व आणीबानी पथकाने धाव घेतले या मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या पथक उप अग्निशमन केंद्र अधिकारी  मोहन मुंगसे , ड्युटी इंचार्ज हरीभाऊ घुगे , अग्निशामक शशिकांत गिते, परेश दुधे, संग्राम मोरे, किरण पागोरे, तुषार तौर, मयुर कुमावत, वाहनचालक शेख आसेफ घटनास्थळी उपस्थीत होते व त्यांनी बाजार सावंगी येथील पोलीसांशी व नागरिकांनशी चर्चा करून शोधकार्य सुरू केले असता काही तासाच्या प्रयत्नानंतर  मृतदेह शोधन्यात आले अग्निशामग दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढुन बाजार सावंगी येथील पोसीसांच्य ताब्यात दिले 

सदर इसमाचे उत्तरे तपासणी प्राथमीक आरोग्य केंद्र बाजार सावंगी येथील डॉक्टर निलोफर मॅडम यांनी केलेली आहे पंचनामा पोलीस हेडकॉन्स्टेबल नवनाथ कोल्हे , दिलीप बनसोड , संजय सपकाळ , प्रकाश ठोकळ यांनी केलेला असुन शोध मोहीम साठी बाजार सावंगी येथील प्रतिष्ठित नागरिक व खुलताबाद नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी जोशी साहेब , तलाठी वीटेकर म्याडम हजर होते

 *जिल्हा औरंगाबाद प्रतिनिधी समीर शहा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या