Advertisement

Responsive Advertisement

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलीस सतर्क ,घोसला येथे दारू अड्ड्यावर छापा...


-सोयगाव /विजय पगारे

-------
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलीस सतर्क झाले असून अवैध दारू विक्रीवर लगाम घालण्यासाठी सोयगाव पोलिसांनी गणेशोत्सव कालावधीत पथक नियुक्त केले सोमवारी या पथकाने घोषणा येथे अवैध्य दारू अड्ड्यावर छापेट टाकून देशी दारूचे ८० बाटल्या व दहा लिटर दारू असा एकूण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ज्या प्रकरणी दोघाविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे घोसला गावात देशी दारूचे ८० बाटल्या विक्री करणाऱ्या व्यक्तीस पकडले त्याच्याकडून देशी दारूच्या ८० बाटल्या जप्त केल्या दुसऱ्या एका छाप्यात दारू गाळप करणाऱ्यांकडून दोन हजार रुपये किमतीची दहा लिटर दारू जप्त केली पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश पंडित, जमादार राजू बर्डे,अजय कोळी, गणेश रोकडे, रवी तायडे,आदींच्या पथकाने ही कार्यवाही केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या