Advertisement

Responsive Advertisement

धर्माबाद येथे अशोकपर्व दहीहंडी उत्सव संपन्न, शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या हस्ते झाले उद्घाटन


धर्माबाद :- धर्माबाद येथे गजानन कुरूंदे मित्र मंडळाच्या वतीने अशोकपर्व दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्माबाद नगरपालिकेचे माजी नगरसेवक नागभुषण वर्णी हे आणि प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते संदीप पाटील कवळे,माजी नगरसेवक शंकर बोलमवार, श्रीराम पाटील जगदंबे,बंडु पाटील बाभळीकर, पांडुरंग पाटील पांगरीकर,हाणमंत पाटील नरवाडे, प्रवीण पाटील, विठ्ठल पाटील सावळे, लक्ष्मण पाटील,अनुपसेठ कासलीवाल,मनोजजी बुंदेले, बाबुराव पाटील आलुरकर, पोलिस उपनिरीक्षक पंतोजी साहेब उपस्थित होते.
अशोकपर्व दहीहंडी महोत्सवाचे प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये कवळे गुरुजी यांच्यावतीने धर्माबाद येथील देवी गल्ली बजरंग दल युवक गोविंदा पथक यांनी ही दहीहंडी फोडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील साखरे तर प्रास्ताविक आयोजक गजानन कुरूंदे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन कुरूंदे मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या