Advertisement

Responsive Advertisement

असाही प्रामाणिक पना....दुकानाजवळ सापडलेले अडीच हजार रुपये...!समाजसेवक दत्तू रोकडे यांनी केले परत....सोयगावातील घटना...

सोयगाव/विजय पगारे
----------------------------
 जगदंबा लॉंड्रीचे मालक समाजसेवक दत्तू रोकडे यांनी त्यांना सापडलेले दोन हजार पाचशे रुपये  वसंत पाटील यांना  परत केल्याची घटना शनिवारी (ता.१४) सोयगाव बसस्थानकावर समोर आली आहे.या मुळे समाजसेवक दत्तू रोकडे यांचे  तालुक्यात कौतुक होत आहे.

     याबाबत माहिती माहीती अशी की, वसंत महादू पाटील रा. मेणगाव ता. जामनेर  जि.जळगाव ता.१४ रविवारी  सकाळी सोयगाव येथून पारोळा येथे जाण्यासाठी सोयगाव  बसस्थानकावर हजर झााले असता.  ८:३० त्याचवेेळी सोयगाावहुुन त्याचवेळी - धुळयासाठी
बस मार्गस्त होणार बस चालकाने स्टेरिगवर बसुन बस सुरु केली. एकमात्र पारोळा जाणारी बस पकडाण्याच्या लगबगीत-घाईघाईत शेतकरी वसंत पाटील यांच्याजवळ असलेले तीन हजार रुपयांपैकी त्यांनी प्रवासासाठी पाचशे रुपये बसचे टीकीट काढण्यासाठी वरती काढले,मात्र दरम्यान अडीच हजार रुपये बटव्यात ठेवत असतांनाच ते पैसे खाली पडले. पाटील हे सोयगाव -धुळे बसने पारोळा जाण्यासाठी निघाले बहुलखेडा गावापर्यंत गेल्यावर त्या वेळी खातरजमा करण्यासाठी बटवा बघीतला शिल्लक असलेले पैसे नसल्याने नरवस झाले . ज्या ठिकाणी उर्वरित रक्कम जीत पडली त्याठिकाणी चार - पाच युवक उभे असतांना देखील त्यांच्या लक्षात आले नाही. दुकानावर इस्तरी करीत असलेले समाज सेवक  दत्तू रोकडे यांच्या लक्षात ही बाब आली त्यांनी ते पडलेले अडीच हजार रुपये उचलून त्यांच्याजवळ परत करण्याच्यादृष्टीने ठेवले. बहुलखेडा उतरुन पाटील पुन्हा सोयगाव गाठले. बसस्थानकावर विचारपूस करीत असतांना स्वतः समाजसेवक दत्तू रोकडे यांनी त्यांना आवाज देऊन दुकानात बोलावून घेतले व अस्त्यांवाईपणे विचारपुस केली.मिळालेले पैसे पाटलाचेच आहेत का? खातरजमा करत नोटा संदर्भात विचारणा केली, त्यांनी सर्व विवरण सांगीतले असता त्यांनी बरोबर सांगितल्याने वसंत पाटील यांना त्यांचे हरवलेले अडीच हजार रुपये माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल निकम यांच्या हस्ते परत करण्यात आले. अशी ही मानचसकी इमानदारी राखीत दत्तू रोकडे यांनी पैसे परत केल्याने वसंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले तर इतरांनी समाजसेवक रोकडे यांचे अभिनंदन केले आहे .

      
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या