Advertisement

Responsive Advertisement

राष्ट्रगीताचे समूह गायन, विश्वविक्रमाची एक संधी! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


       मुंबईदि. 14,: दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे  या कालावधीतराज्यातील प्रत्येक नागरिकाने; "सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात" सहभागी व्हावेअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतचसामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आलेली असूनराज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पुढे म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीप्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसारराज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांना निर्देश देण्यात आल्याची माहितीराज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिली. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय निर्गमित केलेला असूनप्रशासनाच्या वतीने हा उपक्रम लोकसहभागातून साजरा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

            सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले कीदेशभक्तीदेशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज व आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेचत्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. राज्यातील अंगणवाड्यासर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये/ सर्व प्रकारची विद्यापीठे/ खाजगी/ शासकीय सर्व शैक्षणिक संस्था मधील विद्यार्थीव्यापारी प्रतिष्ठानेसेवा पुरवठादारशेतकरीमहिलायुवकज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतीलत्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे असेही सौरभ विजय यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केलेल्या या आवाहनास राज्यातील सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा आणि आपणा सर्वांच्या सहभागातून एक नवा विश्वविक्रम व्हावा यासाठी शासनाच्या वतीने हे आवाहन असल्याचे सौरभ विजय यांनी नमूद केले आहे.

00000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या