Advertisement

Responsive Advertisement

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम तालुक्यातील गावागावात पून्हा राबविण्यात येईल का..?

सोयगाव /विजय पगारे
--------------
गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावात मिटवल्या जावे, तसेच गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन गावाची वाटचाल समृध्दीकडे व्हावी या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील साहेब यांनी ता. १५ ऑगस्ट २००७  ला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती.महात्मा गांधी तंटामुक्त गाव  या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला.  त्यामुळे बरेच गावे तंटामुक्त होऊन विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत आसतानाच,मात्र मागील काही वर्षापासून गावपातळीवरील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडाल्याने ग्रामीण भागात भांडण तंटे दिवसेन दिवस वाढतीवर असल्याचे चिञ निर्माण झाले आहेत,यामूळे गृहविभागाने पून्हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुरु करून गावपातळीवरील तंटे गावात मिटविण्यात सूयश येईल असे ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून बोलल्या जात आहे.   महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंतर्गत गावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करूण त्या समितीच्या माध्यमातून गावात सामाजिक उपक्रम , गावातील लहान मोठे तंटे, एकमेकात असलेले वाद, शेतीचे वाद गाव पातळीवर समितीच्या माध्यमातून सोडविल्या जात होते. त्यामुळे गावातील तक्रारीचे निवारण गावातच होत असल्यामूळे गावातील तंटे पोलीस ठाण्यात पर्यत जात नव्हते तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव  समितीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविल्या जात होते. त्यामुळे गावात शांतता, एकोपा दिसत होता. समितीच्या माध्यमातून गावात दारूबंदी करून दारू हद्दपार केली.गावातील छोटे मोठे भांडण गावात मिटल्या जात होते माञ मागील काही वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडाल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पून्हा राबविण्यात येईल का..? असा प्रश्न ऊपस्थीतित केल्या जात आहे.

(चौकट)--
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम 

समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटते जात होते. त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार जात नसल्याने पोलीस प्रशासनावरील कामाचा भार थोडया प्रमाणात कमी झाला होता,तसेच गावातील वातावरण आनंदीत राहत होते, शासन स्तरावरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा राबवावी अशी माझी मागणी आहे. .. 

मिलिंद सोनवणे  
गाव कामगार पोलीस पाटील संघटना सोयगाव तालुका  .
----------------------
महात्मा गांधी तंटामुक्त गाव 

  समितीच्या माध्यमातून गावातील छोटे मोठे तंटे गावात मिळवल्या जातात. गावात दारू बंदी केली जात होती.अनेकानी दारू सोडली . समाजोपयोगी उपक्रम राबविल्या जात होते. त्यामुळे गावात एकोपा तयार होता. म्हणून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावलेली मोहीम पून्हा सुरू करावी. ..  

(अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती,  युवराज वामने पाटील आमखेडा-ता.सोयगाव)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या