Advertisement

Responsive Advertisement

४९ व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात् ज्ञानेश्वरी गुरुकुल शाळा द्वितीय क्रमांकाने विजयी


 
 फुलंब्री -

जिल्हा परिषद औरंगाबाद व पंचायत समिती फुलंब्री ह्यांच्या सयुक्त विद्यमाने खामगाव येथील श्री गोरक्ष महाविद्यालयात ४९ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्षनाचे आयोजन करण्यात आले . ह्यावेळी विविध माध्यामतून १०० पेक्षा जास्त शाळांनी ह्या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री मोहनराव पाटील सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे श्रीमती ज्योती कवडदेवी गटविकास अधिकारी फुलंब्री , अशोक पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी फुलंब्री व श्री राजेश महाजन साहेब जेष्ठ शिक्षण विस्तारधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती चे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली अध्यक्ष श्री मोहनराव पाटील यांनी शैक्षणिक संस्थेचे कार्य तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा कोणत्याही उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविलाच पाहिजे काही तरी नवीन कार्य केल्यानं विद्यार्थ्यी चुकतो व चुकतो तोच शिकतो जो चुकत नाही तो काही नवीन कार्य करुनच पाहत नाही विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळावी यासाठी शैक्षणिक संस्था विविध उपक्रम राबवित असतेच असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे श्रीमती ज्योती कवडदेवी यांनी ही विद्यार्थ्यांशी हितगुज सादत विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देत मार्गदर्शन केले . प्रमुख पाहुणे राजेश महाजन साहेब व अशोक पाटील यांनी शैक्षणिक संस्थेच्या कार्याची दखल घेत विद्यार्थ्यां स्पर्धा परीक्षा त्यामाध्यमातून विविध सुचना दिल्या.शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रयोग याविषयी विविध प्रश्न विचारून माहिती घेतली .यामध्ये तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विज्ञान प्रदर्शनात विज्ञान व तंत्रज्ञान आणि गणित विषयासाठी एकूण ६६  शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. तर तालुक्यातील ३३  माध्यमिक शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. तसेच विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील ॓प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ११  गटांनी समभाग घेतला. विज्ञान नाट्यत्सोव मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तालुक्यातील १०  शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभाग जि.प प्रा.शा वारेगाव प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी गुरुकुल तर तृतीय क्रमांक जि प प्रा शाळा गणोरी विज्ञान प्रदर्शन माध्यमिक गट प्रथम क्रमांक श्री गोरक्ष विद्यालय खामगाव द्वितीय क्रमांक न्यू हायस्कूल किनगाव तर तृतीय क्रमांक राजे छत्रपती विद्यालय डोंगरगाव कवाड विज्ञान मेळावा यामध्ये प्रथम दिपक भाऊसाहेब उबाळे जि.प.प्रा.शा.गणोरी द्वितीय क्रमांक कार्तिकी किरण खराते श्री गोरक्ष विद्यालय खामगाव यांनी मिळवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या