Advertisement

Responsive Advertisement

नवीन पनवेल पोदी गावात पनवेल महानगरपालिकेचा भोंगळ कारभार...


 पनवेल- महानगरपालिकेच्या ठेकेदाराने अर्धवट काम करून देखील पूर्ण बिलाची रक्कम महापालिकेने ठेकेदाराला अदा केली असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन पनवेल येथील २ नंबर पोदीगाव येथे जून २०२२ रोजी गटाराचे काम करण्यात आले. मात्र ते अर्धवट ठेवून काम अपूर्ण असून देखील  पनवेल महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून पूर्ण बिल अदा करण्यात आले. गटार बांधण्यात आलेल्या चाळीतील मालकाने विचारणा केली असता टाळाटाळ करत दिशाभूल केली व मोठ मोठे राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्यावर समान्य नागरिकांचे काय, उर्वरित काम पूर्ण झालेले नसून कॉन्ट्रॅक्टर बिल काढून मोकळे पनवेल महानगर पालिका माननीय आयुक्त गणेश देशमुख आपण ह्या कडे जातीने लक्ष्य द्यावे , पनवेल महानगरपालिका ह्याकडे लक्ष देईल का असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या