Advertisement

Responsive Advertisement

स्वस्त धान्य दुकानातून गहू झाला कमी ! त्यामुळे आटा चक्की मालक चिंतेत...

सोयगाव 
विजय पगारे
------------  
आपल्या रोजच्या घरगुती वापरात पिठाचे अनन्यसाधारण महत्व आहे.  तसेच चपाती,खीर सोजी ,करण्यासाठी गहू या पिठाची आवश्यकता असते. पूर्वी अशा प्रकारचे ज्वारी, गहू, बाजरी, डाळी घरी जात्यावर दळले जात होते, परंतु हे अत्यंत कष्टप्रत काम पूर्वी होते ते काम कमी झाले असून नवीन तंत्रज्ञान नुसार गिरण्यांचा शोध लागला. 
       घरात पिठाची गरज असते. तसेच प्रत्येक हॉटेल,खाद्य बनविण्याऱ्या संस्था यांना सुध्दामोठया प्रमाणावर पिठांची दररोज आवश्यकता असते.
 
   लोकांना धान्य दळून देण्याची सेवा देणे ,गहू, ज्वारी बाजरी यासारख्या वस्तू दळण्यासाठी वेगळ्या प्रकारची गिरणी . तर डाळी दळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गिरणी असतात.  तसेच मसाले हळद, तिखट इत्यादी दळण्यासाठी सुद्धा आटा चक्की (गिरणी)घेण्यात आली आहे.या सर्व चक्की विजेवर चालणाऱ्या असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. त्यामुळे हा उदयोग अनेक युवक बेरोजगार यांनी उभारला आहे.
मात्र मागील ३ तीन महिण्यापासून स्वस्त धान्य दुकानातुन गहू कमी मिळत असल्याने गरिबांची पोळी महाग झाली आहे,मात्र दररोज दळत असलेल्या दळण आटा मात्र मागील काही महिन्यांपासून कमी  प्रमाणात गहू दळनासाठी येत असल्याने मजुरी सुद्धा निघत नाही तरी कधी गिऱ्हाईक चक्की कडे फिरकत सुद्धा नसल्याचे वास्तविक चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. अशी होत असेलेली परिस्थिती आटा चक्की मालक यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलून दाखविले आहे.

   आटा चक्की  सुरु करण्यासाठी साधारण १ ते १.५० लाख रूपये खर्च येतो. पैसे नसल्याने बँकेतून कर्ज काढले ते सुद्धा बँक मध्ये  आपली पतपाहून योग्य स्वरूपात कर्ज पुरवठा करते. हा उदयोग उभारल्यास आपणांस चांगले उत्पन्न मिळू शकते.या उद्देशाने या उद्योगाची निवड करण्यात आली होती,मात्र आता कधी कधी लाईन बिल सुद्धा जास्त प्रमाणात येतो त्यामुळे सद्या तरी आटा चक्कीचा उद्योग डबघाईस आला आहे.
सध्या अनेक ठिकाणी एक ते दोन गिरण्या असतात. तसेच शहरी भागात जास्त असतात तसेच हॉटेल, खानवळ, रेस्टारेंट आदि ठिकाणी सुध्दा वेगवेळया पिठाचा सुध्दा पुरवठा आपणांस करता येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या