Advertisement

Responsive Advertisement

हर घर तिरंगा उभारणीसाठी सोयगाव येथे समाजप्रबोधनाद्वारे जनजागृती...

सोयगाव/विजय पगारे
--------------------------
स्वातत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्त केंद्र सरकारच्या वतीने हर घर तिरंगा अभियान १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे,  ही माहिती सर्व सामान्य तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी शनिवारी (ता. ६)   समाजप्रबोधनकार तथा लोककलावंत विष्णू  विनायकराव मापारी आणि सहकारी ह .भ. प सुधन्वा महाराज केनेकर महाराष्ट्र शासन व्यसनमुभ्ती सेवा पुरस्कार प्राप्त  सुनिल गुजर  यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा व अजंता व्हॅली इंग्लिश स्कूल येथे समाजप्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.  प्रथमत.राष्ट्रगीत परिपाठ घेऊन  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी समाजप्रबोधनकार विष्णू मापारी सुधन्वा महाराज केनेकर यांनी हर घर तिरंगा उभारणी बाबत चांगल्या पद्धतीने समाजप्रबोधन केले कु. पायल गायकवाड या विद्यार्थिनीने पोवाडा सादर केला. शाळेचे मुख्याध्यापक रामदास फुसे यांनी समाज प्रबोधनकार विष्णु मापारी हरि भक्त पारायण मंडळाचे सुंधन्वा केनेकर यांचे स्वागत केले सूत्रसंचालन  - आभार प्रदर्शन सुनील सोनवणे यांनी केले ज्येष्ठ शिक्षक  मोतीराम जोहरे केद्रप्रमुख फिरोज तडवी सर्व शिक्षक शिक्षिका वैशाली आगे भास्कर पिगाळकर  विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते शेवटी खाऊचे वाटप कराण्यात आले व कार्यक्रमाचा  समारोप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या