Advertisement

Responsive Advertisement

हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियानास विद्यार्थ्यांचा तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...


सोयगाव-
कंकराळा ता.सोयगाव  ग्राम पंचायतीच्या भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करून हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियानास सुरुवात सोमवारी (ता.८) करण्यात आली. जि.प.शालेय विद्यार्थीनी अभियानास  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

कंकराळागावच्या लोकनियुक्त सरपंच चंदाताई शिवदास राजपुत यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती रॅली व प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी " तिरंगा घरा-घरात - देशप्रेम नसा-नसांत " वन्दे मातरम् ,भारत माता की जय घोषणांनी बाजी ने पुर्ण कंकराळा नगरीच दुमदुमून टाकली होती, ता.८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजनेअंतर्गत १३-१५ ऑगस्ट  दरम्यान " हर घर तिरंगा " या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ढोल, पथकासह झांज पथक घेऊन पायी रॅली गल्ली-गल्ली डोअर टू डोअर राष्ट्र ध्वज तिरंगा सहीता व सन्मानपूर्वक रहिवाशांनी आपआपल्या घरावर लावावा फलकही हातात दिसून आले.यावेळी कंकराळा ग्रा.पं.चे ग्रामसेवक  एस.बी.पुल्लेवाड , मुख्याध्यापक एस.आर.खाकरे , शिक्षक महेश गवादे , पोलिस पाटील उज्वलाबाई बिंदवाल , ग्रा.प.सदस्य गणेश राजपुत , माजी सरपंच शिवदास राजपुत , माजी पोलिस पाटील भागवत पाटील , युवानेते कुणाल राजपुत , अंगणवाडी सेविका शोभाबाई बिंदवाल, मदतनीस संगिताबाई बडकणे , आशासेविका शशिकला शिंदे , महीला बचतगट अध्यक्ष रत्नाबाई ढाकरे , शाळा समिती उपाध्यक्ष भगवान ढाकरे ,  शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे आदी पदाधिकारी व शासकीय कर्मचारी यांनी देखील उत्स्फूस सहभाग घेतलेला दिसुन आला.रॅलीचा पुन्हा शाळेत येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या