Advertisement

Responsive Advertisement

गोमातेची सेवा करून व संरक्षण-संवर्धन करा संतोष महाराज गायकवाड यांच प्रतिपादन....

शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर 

भगवान श्रीकृष्णाने गायीला जवळ केले, तिच्यासाठी वेणुवादन केले, गायींना चरण्यासाठी नेले, त्यांचे रक्षण केले, तसे आपणही गोमातेच्या ऋणात राहूया आणि गोसेवेस सुरुवात करूया. 
गोमातेची सेवा करायला आणि चारा घालायला विसरू नका असे प्रतिपादन तलवाडा येथील किर्तनात केले. 

मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथील हनुमान मंदिर 89 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा मधिल वर्षी जिर्णोद्धार करण्यात आला.मंदिराचा पहिला वर्धापन दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व श्रीकृष्ण जन्माष्टमी याच औचित्य साधुन इंडियन आयडॉल मध्ये गायलेले राहुल खरे उत्कृष्ट तबला वादक कुष्णा महाराज पाराळकर पुरुषोत्तम महाराज यांनी भजन व देशभक्तीपर गीते सादर करण्यातआले सकाळी ह.भ.प.संतोष महाराज गायकवाड यांचे कीर्तन झाले.
यावेळी कु.ऊ.बा.सभापती भागिनाथ मगर  पंचायत समिती मा उप सभापती राजेंद्र मगर राजाभाऊ निकम पुरुषोत्तम महाराज, चांगदेव महाराज,भाऊसाहेब मगर,जनार्दन मगर,दादाभाऊ मगर,संतोष सुर्यवंशी,विठ्ठल मगर,सुभाष मगर किशोर मगर,वसंत मगर,चेअरमन राजेंद्र मगर, रवि मगर,यांची प्रमुख उपस्थिती होती. 

संतोष महाराज गायकवाड बोलताना म्हणाले गोपाष्टमीच्या निमित्ताने गोमातेची सेवा करायला आणि गाय-वासराला चारा घालायला विसरू नका
भगवान श्रीकृष्णाने गायीला जवळ केले, तिच्यासाठी वेणुवादन केले, गायींना चरण्यासाठी नेले, त्यांचे रक्षण केले, तसे आपणही गोमातेच्या ऋणात राहूया आणि आजपासुन गोसेवेस सुरुवात करूया गोमातेची सेवा करायला आणि चारा घालायला विसरू नका
भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पुजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावयाचा आहे. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी यानिमित्ताने वसुबारसेला आपण जशी गाय वासराची पूजा केली, तशीच पुजा किंवा त्यांची सेवा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अभिप्रेत आहे. 
सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे, अशी योग्यता असलेल्या गोमातेचे पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, 
गाईला हिंदू धर्मात मातेचे स्थान दिले जाते आणि गाईमध्ये 33 कोटी देव सामाविष्ट असतात असे वैदिक धर्मग्रंथात नमूद केले आहे.जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात सांगता गोपाळकाला करूनच होते.
कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.
गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, दही, ताक,साखर, इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत
गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो. काल्यातील प्रमुख घटक
दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक आहेत.आसे विविध कृष्णाच्या लिला सावंत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी अपघाती निधन झालेले विनायक मेटे यांना सामुदायिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येत हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या