Advertisement

Responsive Advertisement

क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या वतीने ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती


     पनवेल - महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियान राबवित आहे. त्यात आपला ही सहभाग व्हावा म्हणून सतत सामाजिक क्षेत्रात झटणाऱ्या सौ रुपालीताई शिंदे ह्यांनी आपल्या फाउंडेशन च्या पदाधिकारी व सदस्यांना झेंडे देऊन मार्गदशन करण्यात आले.                  ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियानात सामीलव्हावे म्हणून इतर भागातील संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांना देखील झेंडे देऊन त्या बद्दल  मार्गदर्शन करण्यात येणार आहे  .         तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ रुपालीताई शिंदे यांनी ह्या बाबतीत माहिती दिली.        पनवेल महानगर पालिका आयुक्त मा. श्री गणेश देशमुख व अधिकारी कर्मचारी सर्व प्रशासन या कामी उल्लेखनीय प्रयत्न करीत आहे प्रसार करीत .                     याच बाबतीत पनवेल महानगर पालिकेचे प्रसार अधिकारी उपायुक्त मा. श्री विठ्ठल डाके यांच्या काडून झेंडा फडकविण्याबाबतचे मार्गदर्शन घेण्यात आले , तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी उपायुक्त साहेबांनी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्या दिल्या.
      ‘घरोघरी तिरंगा’ उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साजरा करावा या उद्देशाने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील , सामाजिक संस्था, बचत गट,यांनी देखील पुढाकार घ्यावा असे रुपालीताई यांनी महिलांना सांगितले .
    या दरम्यान घरोघरी झेंडा फडकविण्याबाबतचे मार्गदर्शन  केले. तिरंगा ध्वजासोबतचा फोटो (सेल्फी) पालिकेच्या ‘पनवेल महानगरपालिका’ या फेसबुक अकाउंटला टॅग करण्याबाबत सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या