Advertisement

Responsive Advertisement

आतकुर सा. गणेश मंडळ च्या अध्यक्ष पदी दिनेश दारमोड यांची निवड

धर्माबाद:-धर्माबाद जवळच असलेल्या आतकुर येते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेश मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक शनिवारी सायंकाळी हनुमान मंदिरात घेण्यात आली या बैठकीस मंडळाचे जेष्ठ आजी-माजी अध्यक्ष,सचिव,पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या एकमताने आतकुर सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणून धार्मिक व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त मा.दिनेश भाऊ दारमोड यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सार्वजनिक गणेश मंडळात
उपाध्यक्ष कृष्णा पुलकंटवार,कोषाध्यक्ष श्याम सरकलवाड, सचिव शिवा तोटलोड,सदस्य आकाश सरकलवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी सर्व गावकरी उपस्थित होते.या निवडीबद्दल सोशल मीडियावर शुभेच्छा देत अनेकांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या