Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव तालुक्यात शंभर टक्के घरांवर घरघर मोहीम...२३ हजार,४८९ घरांवर ध्वजारोहण...

   सोयगाव/विजय पगारे
~~~~~~~~~~~~~~

शासनाच्या हरघर झेंडा मोहिमेत शंभर टक्के घरांवर ध्वजारोहण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी दिली.सोयगाव तालुक्यात हरहर झेंडा मोहिमेदरम्यान पहाटे पासूनच उत्सवाचे वातावरण तयार झाल्याने शनिवारी सोयगाव तालुक्यात एक आगळा वेगळा सण या निमित्ताने साजरा झाल्याचे पहावयास मिळाले.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला शनिवार पासून प्रारंभ झाला या उपक्रमात हरघर झेंडा या मोहिमेत शंभर टक्के कुटुंबीयांनी सहभाग नोंदविला असल्याने सोयगाव तालुक्यात हा उपक्रम ग्रामीण सण म्हणून साजरा करण्यात आला आहे.या दरम्यान कुटुंबीयांनी पहाटे घरावर मोठ्या बांबूंचा आधार देत ध्वजारोहण केले काही भागात या उपक्रमात सण साजरा करणात आला आहे.त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून एक नवीन एकत्रित कुटुंब पद्धतीचा सण शनिवारी पहावयास मिळाला होता.सोयगाव पंचायत समितीच्या नियोजनाने सोयगाव तालुक्यात २३ हजार ४८९ घरांसाठी ध्वज वितरीत करण्यात आले होते जिल्ह्यात सोयगावला सदोष ध्वज मिळाले असल्याचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी सांगितले जिल्हा परिषदेकडून मागणीनुसार प्राप्त झालेल्या ध्वजांची दहा ग्रामसेवकांच्या पथकांकडून आधीच तपासणी करण्यात आली होती त्यामुळे ग्रामीण भागात एकही ध्वज खराब आढळून आलेला नसल्याचे गटविकास अधिकारी नाईक यांनी सांगितले...

   चौकट—शेतातील घरांवर ध्वजारोहण---

 बनोटी भागात अनेक गावातील नागरिक शेतावरच वास्तव्यास आहे त्यामुळे शेतावर असल्वेल्या घरांवरही ध्वजारोहण झाले आहे.या उपक्रमात पहाटे मजुरांनीही ध्वजारोहण केले...

  चौकट—आदिवासी काळदरी आणि रामपूरवाडी या दोन्ही आदिवासी गावातही हरघर झेंडा मोहीम पोहचली होती तालुका प्रशासनाने या गावांनाही जनजागृती केल्याने आदिवासी ग्रामस्थांनीही हरघर झेंडा मोहिमेत सहभाग घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या