Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघचा नाव नोंदणी अभियान उत्साहात ,अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता सह सन्मान ...

सोयगाव/विजय पगारे
 ^^^^^^^^^^^^^^^^^

 औरंगाबाद  येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रामध्ये बुधवारी (ता. १०)  महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाच्या माध्यमातून पत्रकार नोंदणी व चर्चासत्र हा कार्यक्रम संपन्न झाला. 
या कार्यक्रमास औरंगाबाद तालुका औरंगाबाद ग्रामीण भाग तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी, पत्रकार, संपादक, छायाचित्रकार, कॅमेरामन , अदिंनी  या चर्चासत्राला आपली प्रमुख उपस्थिती लावली होती . हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात. व उत्साहात पार पडला .


मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रामध्ये १० ऑगस्ट रोजी  महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाच्या माध्यमातून पत्रकार नोंदणी व चर्चासत्र या आयोजित कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या भव्य प्रतिमा पुजन आणि पुष्पहार अर्पण करून प्रमुख पाहुण्याच्या हस्ते झाले .
 या कार्यक्रमाला तालुकास्तरावरून मोठ्या प्रमाणावर पत्रकार बांधव हजर होते . आजच्या या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघ का स्थापन करण्यात आला ? या संघाच्या नेमका उद्देश्य काय ? या संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी काय उपाययोजना केल्या जातील ? संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडीअडचणी कशा सोडवल्या जातील ? त्यांना कायदेशीर मदत कशी दिली जाईल ? या पत्रकारांची शासन स्तरापर्यंत कशी नोंद घेतली जाईल ? याबाबतचा सविस्तर चर्चा झाली .  प्रस्ताविक महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सुधीर खैरे यांनी विस्तृत माहिती पत्रकार बांधवांना दिली ,  चर्चा क्षेत्रामध्ये अनेक महिला प्रतिनिधी पत्रकार सुद्धा आवार्जु  हजर  होत्या या महिला प्रतिनिधींनाही आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला .  यावेळेस पत्रकारिता क्षेत्रांमध्ये ग्रामीण भागामध्ये महिला पत्रकार कशाप्रकारे कार्य करत आहेत त्यांना येणाऱ्या काही कायदेशीर अडचणी काही अधिकाऱ्यांकडून होणारी दडपशाही काही राजकीय लोकांचे दबाव याबाबतही महिला पत्रकारांनी आपली बाजू सर्वासमक्ष मांडून सर्व पत्रकार बांधवांनी महिलांसोबत खांद्याला खांदा लावून काम करावे व आम्हाला सहकार्य करावे अशा भावना महिला पत्रकारांनी व्यक्त केल्या . तसेच अनेक संपादक या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते . या संपादकांनी येणाऱ्या काही काळामध्ये छोटे छोटे साप्ताहिक दैनिक यांना शासन स्तरावर ती कसे डावलले जाते शासकीय यादीमध्ये नाव घेण्यामध्ये माहिती कार्यालयातून काय काय अडचणी येतात वेळप्रसंगी प्रशासनातर्फे कशाप्रकारे खोटे आरोपात केसेस दाखल केल्या जातात काही राजकीय व्यक्ती त्यांच्या दबावात गुंड प्रवृत्तीच्या लोकांमार्फत पत्रकारांवरती कशाप्रकारे दबाव आणतात अशा अनेक गोष्टी या चर्चासत्रामध्ये उपस्थित झाल्या . त्यानंतर महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाचे सचिव प्रकाश सातपुते  यांनी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघ हा केवळ औरंगाबाद साठी नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या संघाची नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात होत असून संघाने वेगवेगळे तालुके जिल्हे या ठिकाणी कशी संघाची आखणी केलेली आहे त्या माध्यमातून पत्रकार ,संपादक, छायाचित्रकार, कॅमेरामन, कशाप्रकारे जोडले जात आहेत आणि आपण एकजुटीने पुढे भविष्यात कशाप्रकारे काम करत राहू याबाबत पत्रकारांना मार्गदर्शन केले . त्यानंतर महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाचे माननीय संस्थापक अध्यक्ष दादासाहेब काळे  यांनी आपले अध्यक्षीय भाषणामध्ये संघ कसा निर्माण झाला ? का निर्माण झाला ? या मागचे उद्देश्य काय आहे ?  याबाबत सविस्तर वृत्तान देतांना त्यांनी सांगितले की आज तळागाळातला, खेड्यापाड्यातला, वाड्या, तांड्यावरचा, पत्रकार पत्रकारिता करत असताना त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे त्याच्या घरची परिस्थिती काय आहे त्याच्या पाल्यांना संघातर्फे कशी मदत होईल त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळेल त्यांना शासकीय योजनेच्या माध्यमातून घरकुल ,वैद्यकीय सुविधा, छायाचित्रकारांसाठी त्यांच्या कॅमेरा घेण्यासाठी बँकेतून लोन असे अनेक विषयांवरती त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले . त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाच्या संचालक मंडळातर्फे औरंगाबाद शहर, औरंगाबाद तालुका, तसेच जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधींना नियुक्तीपत्र देऊन संघ वाढीसाठी प्रयत्न करावा असे सांगून सर्वांनी एकजूट करून महाराष्ट्र पत्रकार जनसंघ मोठा करावा आणि प्रत्येक पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराला सहकार्य करावे वेळप्रसंगी त्याच्या साठी धावून जाऊन उभे राहावे संघही त्यांच्या मागे तितक्याच तत्परतेने उभा राहील आणि या माध्यमातून पत्रकाराच्या जीवनामध्ये उज्वलाची कामगिरी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघ सदैव कार्यरत राहील असे अध्यक्ष महोदयांनी सांगितले आजच्या या कार्यक्रमाला शहराध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटक, सह संघटक, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष ,कोषाध्यक्ष ,अशा विविध पदावरती वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद ,वाळूज, कन्नड, पैठण ,इत्यादी तालुका स्तरावरती पत्रकारांना विविध पदावरती नियुक्ती देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी
राष्ट्रीय सचिव प्रकाश सातपुते, ताज खान,निर्मला भालेराव, संपादिका  मंगलाताई हिवाळे, श्रीमती ताज खा मॅडम , पांडुरंग गायकवाड, अनिल भालेराव , सोयगाव चे विजय पगारे , आनंद संत , संपादक जिवा भाऊ इंगळे , संपादक फिरोज खान पठाण , यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती . यावेळी सचिव प्रकाश सातपुते , कार्याध्यक्ष  सुनील वैद्य, इमरान पठाण, साजिद भाई पठण  ,बाबासाहेब सोनवणे ,पांडुरंग गायकवाड, रमेश नेटके, योगेश  शेळके , दुर्गेश आपार , इत्यादींनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी रित्या  संपन्न केला .आजच्या या कार्यक्रमांमध्ये औरंगाबाद शहर तसेच तालुका येथील अनेक पत्रकारांनी आपले नाव नोंदणी करून आजचा कार्यक्रम यशस्वी केला .
- - - - - - - -
 - 
नवनियुक्त पदाधिकारी असे 

विभागीय उपाध्यक्ष विजय पगारे, कन्नड तालुकाध्यक्ष रवींद्र खरात ,कन्नड तालुका संघटक शिवाजी नवले, सिल्लोड तालुका संघटक शेख सरफराज, मोहम्मद इस्माईल, औरंगाबाद तालुका अध्यक्ष अनिल भालेराव ,औरंगाबाद तालुका सहसंघटक राजू साठे, औरंगाबाद महानगर महिला  प्रमुख श्रीमती ताज खान पठाण ,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष महिला आघाडी  मंगलाताई हिवाळे,महानगर महिला  कार्याध्यक्ष विमलताई भालेराव, महानगर उपाध्यक्ष अजमत पठाण, महानगर कार्याध्यक्ष गजानन इंगळे ,महानगर संघटक शेख सलमान ,महानगर सहसंघटक अर्जुन पवार , मराठवाडा उपाध्यक्ष अजमत पठाण, फुलंब्री तालुकाध्यक्ष राधेश्याम हिवाळे,फुलंब्री तालुका सहसचिव अजिंक्य काथार,फुलंब्री तालुका संघटक राधेश्याम हिवाळे, वैजापूर तालुका उपाध्यक्ष संदीप गायके, गंगापूर तालुका संघटक भगवान बनकर ,गंगापूर तालुका सल्लागार रावसाहेब खरात ,वाळूज महानगर संघटक संजय निभोने यांना  नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या