Advertisement

Responsive Advertisement

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित रामजीनगर शाळेत विविध उपक्रमांची रेलचेल

सोयगाव/विजय पगारे
---------------------------
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने विद्यार्थ्यी,पालक,माता,मजी विद्यार्थी सर्वांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन सोयगाव केंद्राचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील व सहशिक्षक आसिफ देशमुख यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने आयोजन केले असून.याचाच एक भाग म्हणून शनिवार ता.६ऑगस्ट रोजी शाळेच्या आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तर सोमवारी हर घर तिरंगा यासाठी काळेनगर,रामजीनगर भागात विद्यार्थी दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन, चित्रकला स्पर्धा,प्रबोधनपर व्याख्यान,निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,बाल गोपाळ पंगत यांचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी शाळेला सोयगांंव नगराध्यक्षा,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व. सदस्य,आजी माजी नगरसेवक,पालकांचे सहकार्य लाभत आसून या उपक्रम बद्दल गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या