Advertisement

Responsive Advertisement

कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढत राहणार - शिवसेना चंद्रकांत खैरे
औरंगाबाद . २ (प्रतिनिधी) - हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जय जवान जय किसान आणि जय कामगार असा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना प्रत्येक कामगारांच्या सुखदुःखात सहभागी होते. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून नोकरी, वेतनवाढ आदी न्याय हक्कासाठी लढत आहे. यापुढे लढत राहील, अशी ग्वाही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणूक शिवशाही निष्ठावंत पॅनलच्या प्रचारार्थ ते आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी जिल्हाप्रमुख आमदार आंबादास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींसह मान्यवर यांनी मार्गदर्शन केले. शिलाई मशीन, नारळ, गॅस सिलेंडर चिन्ह असलेले उमेदवार विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणूक शिवशाही निष्ठावंत पॅनलच्या प्रचारार्थ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त रॅली काढण्यात आली. 
रॅलीत भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पवार, ऍड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, आनंद तांदूळवाडीकर, बंडू ओक, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख विजय वाघचौरे, राजेंद्र दानवे, सचिन गरड, कैलास भोकरे, आदमाने, शिवाजी बनकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, नलिनी महाजन, शहरसंघटक आशा दातर, मीरा पाटील, उमेदवार सागर शिंदे, कमल कल्याण गरड, बिबन सय्यद, मंदा कैलास भोकरे, कल्पना दुधट, विजय सरकटे, निवृत्ती साळे, शकुंतला चंदन, शरद पवार, कुकलारे, सतीश हिवाळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या