Advertisement

Responsive Advertisement

श्री छावणी गणेश महासंघ कार्यलयाचे भव्य उद्घाटनऔरंगाबाद शहर प्रतिनिधी- केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत जी कराड यांच्या हस्ते छावणी गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन /आज दि.२८ /८/२०२२ रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत  कराड यांच्या हस्ते छावणी गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, उद्घाटन झाल्यानंतर सामूहिकरित्या श्री ची आरती करण्यात आली. या उद्घाटन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे तसेच औरंगाबाद पश्चिम चे आमदार श्री संजय शिरसाठ, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर अशोक सायना यादव, माजी उपमहापौर राजू शिंदे, रखमाजी जाधव, औरंगाबाद शहर गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, छावणी परिषदेचे मुख्यकार्य अधिकारी संजय सोनवणे, छावणी परिषदेचे मनोनित सदस्य प्रशांत तारगे, रखमाजी जाधव,किशोर कछवा,संतोष आमले, अँड.अशोक मूळे,शिवाजी गायकवाड, दिपक बनकर,दिपक ढाकणे,करण सिंग काकस, शेख हनीफ, अनिल जयस्वाल, संजय गारोल ,राजेश आमले, भगवान आमले, गणेश कांबळे, अतुल शिंदे, राहुल वाणी, बाळासाहेब (बालाजि) आमले, माऊली आमले,अँड.पप्पू वर्मा, महादेव जाधव, नितीन यादव, संतोष शिंदे, नवनाथ मात्रे, किसन कनिसे, शेख वजीर, गणेश कल्याणकर ,संजय धर्म रक्षक, एम ए.अझर , इत्यादी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच छावणी,पडेगाव,भावासिंगपूरा,मिटमिटा तील विविध मंडळातील अध्यक्ष पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. छावणी गणेश महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक आमले यांनी प्रमुख अतिथी डॉ.कराड यांचा शाल व पुष्पहार घालून स्वागत केले तसेच इतर मान्यवरांचेही गणेश महासंघाचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छावणी गणेश महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक सल्लागार माजी महापौर अशोक सायना यादव यांनी यावेळी सांगितले की छावणी गणेश महासंघ हा महाराष्ट्रातील इतर महासंघपैकी एक वेगळा महासंघ असून या महासंघाचे विशिष्ट अशी परंपरा आहे छावणी गणेश महासंघ ही एक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते, आपल्या पुढील जीवनामध्ये यशस्वी अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, विविध पदावर विराजमान झालेले आहेत छावणी गणेश महासंघाने सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी दिलेली असून या संघामध्ये कोणत्या प्रकारचा जातीय भेदभाव पाळला जात नाही छावणी गणेश महासंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करतात तसेच छावणी गणेश महासंघाचे गणेश विसर्जन हे एक दिवस उशिरा होते हेही त्यांनी आवर्जून सांगितले आणि केंद्रीय राज्यमंत्री यांना विशेष अनुरोध केला की आपण केंद्रीय मंत्री असून सध्या औरंगाबाद शहरासाठी मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे पण त्या निधीचा उपयोग छावणीसाठी होत नाही तेव्हा आपण छावणीसाठी काहीतरी निधी उपलब्ध करून दिल्यास छावणीचाही विकास होईल व छावणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उदयास येईल कारण की छावणी ही औरंगाबाद शहराचे नाक असून याकडे आपण विशेष असे लक्ष दिले पाहिजे अशी विनंती त्यांनी केंद्रीय मंत्री महोदयांना केली तसेच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही छावणी गणेश महासंघ एक उत्कृष्ट असा महासंघ असून छावणी गणेश महासंघाच्या मार्फत छावणी मध्ये सजीव देखाव्याने  विशेष भर दिलेला असतो आणि त्या माध्यमातून समाज जनजागृती प्रबोधन केले जाते त्यानंतर केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड यांनी सर्व छावणीवास यांना शुभेच्छा देऊन आवर्जून सांगितले की मी येत्या काही दिवसांमध्येच केंद्रीय रक्षा मंत्री यांची बैठक लावून आपल्या सर्वांना मी तिथे आमंत्रित करून छावणीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी जरूर असे प्रयत्न करेल आणि छावणीच्या विकासासाठी माझ्याकडून जे काही शक्य होईल ते निश्चितच मी करेल तसेच त्यांनी औरंगाबाद साठी प्रधानमंत्री यांच्या योजनेच्या माध्यमातून चाळीस हजार घरे पडेगाव येथे लवकरच उपलब्ध करून दिले जातील आणि त्याचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान यांच्या शुभहस्ते लवकरात लवकर केले जाईल याही असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले मी केंद्रीय मंत्री असल्यामुळे छावणीसाठी मी निश्चित काहीतरी चांगले योग्य ते कार्य करेल आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये यावे आपण संयुक्त बैठक घेऊन छावणीसाठी विशेष काहीतरी करू असे सांगितल्यानंतर केंद्रीय वित्तमंत्री डॉक्टर कराड यांनी एक विशेष घोषणा केली की छावणी मधील जितके मंडळ असतील त्या मंडळाच्या अध्यक्षांचा दोन लाख रुपये चा विमा मी स्वतः माझ्यातर्फे काढून देणार आहे त्यासाठी छावणी मधील जेव्हढेकअ मंडळ असतील त्या अध्यक्षांची यादी माझ्याकडे देण्यात यावी विसर्जनच्या दिवशी या सर्वांचा विमा काढण्याची प्रत त्या मंडळाचे अध्यक्षांच्या स्वाधीन केली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. त्यानंतर गणेश महासंघाचे अध्यक्ष श्री अशोक आमले यांनी सर्व मान्यवरांचे गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आणि येणाऱ्या दिवसांमध्ये छावणी गणेश महासंघातर्फे विविध खेळांचे कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये नियमत राहून गणेश उत्सव आनंदात साजरा करावा असेही आव्हान गणेश भक्तांना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या