Advertisement

Responsive Advertisement

मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त ज्ञानविकास विद्यालयात अभिवादन

भराड़ी -                  येथील ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त उपस्थित पालक श्री. विष्णु काकड़े यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
                    याप्रसंगी शाळेचे सहशिक्षक श्री. व्ही.एच. गव्हाने यांनी विद्यार्थियांना मार्गदर्शन करताना सांगितले की हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे व त्यातल्या त्यात मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी चे नावाजलेले व विश्वातील सर्वोत्त्कृष्ट खेळाडू होते. म्हणून त्यांना हॉकीचे जादूगार सम्बोधले जायचे 1928,1932 व 1936 मध्ये त्यांनी भारताला ओलिंपिक स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. ध्यानचंद यांनी 1948 साली आपल्या कारकिर्दीचा शेवटचा सामना ते खेळले. त्यांच्या काळात केवळ त्यांच्या योगदानामुळेच भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ समजला जायचा. म्हणून भारत सरकारणे मेजर ध्यानचंद यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीड़ा दिन म्हणून घोषित केला व तो पूर्ण देशभरात आजच्या दिवशी साजरा केला जातो असे श्री. गव्हाने म्हणाले.
                    यावेळी पालक श्री. काकड़े यांच्या सह ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षक,शालेय वाहनचालक मालक यांची उपस्थिति होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या