Advertisement

Responsive Advertisement

श्री अमृतेश्वर शिक्षक पतसंस्था सोयगाव येथे फुलंब्री शिक्षक पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा निमित्त दिली सदिच्छा भेट ...

सोयगाव /विजय पगारे
-------------------------

 श्री अमृतेश्वर शिक्षक पतसंस्था सोयगाव  कार्यालयाला फुलंब्री पतसंस्थेचे चेअरमन  जगन ढोके, सहकारी पदाधिकारी व्हा. चेअरमन दिलीप वाघोले,सचिव  संतोष जाधव , खजिनदार सय्यद आराफत, संचालक प्रदीप बारकुले  संचालक मंडळाने-शिष्टमंडळानी पतसंस्था कामकाज अभ्यास दौरा साठी मंगळवारी (ता.२)अभयास दौरा निमित्त सदिच्छा भेट देेत पतसंस्थेच्या कामकाज बाबत प्रदीर्घ वेळ चर्चा करून कामकाज बाबत अधिकची माहिती जाणून घेतली.
     श्री अमृतेश्वर पतसंस्थाच्या पारदर्शक संगणकीकृत तसेच सभासद स्नेही यांच्या कारभार बाबत पतसंस्था संचालक मंडळाच्या वतीने माजी चेअरमन संचालक  भास्कर चौधरी यांनी यावेळी विस्तृत माहिती दिली, दरम्यानच्या चर्चेत सचिव  गोपाल चौधरी ,संचालक  किरण पाटील ,सभासद सचिव  रामदास फुसे , लिपिक प्रमोद जाधव व कर्मचारी रमेश वामने यांनी सहभाग घेतला होता . शिष्टमंडळाने पतसंस्थेत प्रामुख्याने  सुरू असलेल्या ठेव योजना, pdf  कपात पत्रके, sms सुविधा , सॉफ्टवेअर , कर्ज मर्यादादेत वाढ करणे , सभासद कर्जाचे व्याजदर कसे कमी करता येईल , बँक cc कर्ज कमी करणे बाबत ,शिक्षक कल्याण निधी योजना , अपघात विमा , rtgs/neft सुविधा , थकीत कर्ज वसुली , सभासदांना  अधिकाधिक सुविधा देने , पतसंस्थेच्या विकास करणे आदी विषयावर चर्चा विचारविनिमय  करण्यात आला.श्री अमृतेश्वर शिक्षक पतसंस्थेच्या प्रगती व पारदर्शक सभासद स्नेही उत्तम कामकाजाचे  अभिनंदन केले .परस्पर सहकार्याने सहकार चळवळ मजबूत करण्याचे दोन्ही पतसंस्था पदाधिकाऱ्यांनी  निश्चित केले या वेळी  फुलंब्री शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन व सर्व  पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार श्री अमृतेश्वर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. जय सहकार " विना सहकार नाही उद्धार " जयघोष यावेळी करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या