Advertisement

Responsive Advertisement

तामसा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त शोभा यात्रा उत्साहात संपन्न


  हदगाव (ता.प्र.विकास राठोड )                            
जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले.यात आदिवासी पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा करून पूर्ण शहरभर नृत्य सादर दांडारणे आणि डीजेच्या तालावर ठेका धरत तरुणांसह जेष्ठ नागरिकांनी सुध्दा आनंद साजरा केला. महिलांची संख्या लक्षणीय होती. पारंपारिक पद्धती आणि आजची पद्धती यांची सुनियोजित सांगड घालून शोभा यात्रा उत्साहात पार पडली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली, शोभायात्रेत क्रांतिवीर बिरसा मुंडा, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आदी महामानवाच्या तैलचित्राची मुख्य रस्त्यावरून मिरणवणुक काढण्यात आली. जय शिवराय, जय भीम, जय बिरसा मुंडा, जय आण्णा भाऊ साठे, जागतिक आदिवासी गौरव दीन चिरायू होवो या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील सर्व मुळ आदिवासी बांधव यांच्यासह आंध आदिवासी समाज संघटना, आफ्रोट कर्मचारी संघटना, सरपंच संघटना, जयस संघटना, बिरसा ब्रिगेड यांच्यासह हदगाव तालुक्यांतील सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने भव्य दिव्य अश्या शोभा यात्रा उत्साहात संपन्न झाली. तसेच ग्राम पंचायत कार्यालयाच्या बाजूस असलेल्या चौकात बिरसा मुंडा चौक नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  एडवोकेट रामदास डवरे(आदिवासी संघटना तालुकाध्यक्ष) संदीप भाऊ राठोड (माजी पंचायत समिती सदस्य )डॉ.बळीराम भुरके, डॉ. दीपक नाईक,शंकर मेंडके (माजी उपसभापती) माधव कसबे (मुख्याध्यापक) अवधूत भिसे (सरपंच) पत्रकार रामराव मोहिते, भगवान शेळके, अंकुश मिराशे, प्रशांत खंदारे, रामजी वाकोडे, प्रदीप खांनजोडे, श्रीरंग देशमुखे, बी .ई.ओ. किसनराव फोले , डी.के.बुरकुले,सह परिसरातील आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.    याच बरोबर पि आय.किरवले साहेब, आणि पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वच पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या