Advertisement

Responsive Advertisement

संत शंकरस्वामीं महाराजांनी अध्यात्मिक संपत्ती बहाल केली : पंढरीनाथ महाराज पगार

शांताराम मगर प्रतिनीधी वैजापुर 


आपले चित्त भगवंताच्या पायी लावणे म्हणजे परमार्थ असून सर्व संपत्तीपेक्षा परमार्थ मधील संपत्ती महत्वाची आहे, संत शंकरस्वामी महाराजांनी अध्यात्मिक संपत्ती बहाल करून आपल्याला श्रीमंत केले असे प्रतिपादन संत शिवाई संस्थानचे अध्यक्ष , भागवताचार्य पंढरीनाथ महाराज पगार यांनी केले. 
शिऊर येथे सुरू असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या २७७ व्या फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दिनांक ४ रोजी त्यांचे कीर्तन झाले, "माझे चित्त तुझे पायी" या रचनेवर विवेचन करताना ते बोलत होते. 
मानवी विकासाचे केंद्रस्थान म्हणजे हरिनाम सप्ताह असून, या सप्ताहाच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांची ऊर्जा मिळत असते,  साधुसंतानी भारतीय संस्कृती टिकवली असल्याचे पंढरीनाथ महाराज पगार यांनी नमूद केले. 
*आमदार बोरणारे यांची भेट, ७७ पोते साखरेची रक्कम सुपूर्द* 
कोरोनाच्या प्रादुर्भावनंतर व्यापक प्रमाणात हा सप्ताह होत आहे, सप्ताह मध्ये भाविकांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे, वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे यांनी आज या सप्ताह मध्ये भेट दिली व महाप्रसादसाठी ७७ पोते साखरेची रक्कम सप्ताह समितीकडे सुपूर्द केली. 
दरम्यान शिऊर या संतभूमीच्या विकास करण्यासाठी कटिबद्ध असून शिऊर गावात स्वागत कमान, अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक , सभामंडप,  प्रणिता तीर्थ विकासासाठी तब्बल सव्वा तीन कोटींचे अंदाजपत्रक तयार केले असल्याचे आमदार बोरणारे म्हणाले. यावेळी वैजापूरचे उपनगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषद सदस्य रामहरी जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*आमटीचे ट्रॅकर, ९ चुलांगण* 
अखंड हरीनाम सप्ताहात अन्नदानाला विशेष महत्व आहे, अन्नदानाची सुरुवात श्री संत शंकरस्वामी महाराजांनी २७७ वर्षापूर्वीच सुरू केली होती, ही परंपरा कायम ठेवत आधिक व्यापक स्वरूपात वाढविण्यासाठी समाधी मंदिर विश्वस्त मंडळ व सप्ताह समिती प्रयत्नशील आहे, भाविकांना भोजनासाठी ट्रॅकरच्या माध्यमातून आमटी वितरित करण्याचे नियोजित आहे तर दिनांक ९ रोजी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे, जवळपास एक लाखावरून आधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे, तब्बल १११ पोते साखरेच्या माध्यमातून महाप्रसाद तयार करण्यात येणार असून यासाठी मोठे ९ चुलांगण तयार केले आहे. 

*सप्ताहाची वैशिष्ट्य*
अखंड २४ तास चालणारे भजन...१५ मिनिटांत लाखो भाविकांना एकाचवेळी महाप्रसाद वितरण...या महाप्रसादासाठी गावागावांतून एकाचवेळी येणाऱ्या विनामूल्य लाखो भाकरी...एकाच वेळी तयार होणारी तब्बल पाच हजार लिटर आमटी..अखंड चालणारे आमटी-भाकरी प्रसाद वितरण.सात दिवसाच्या या उत्सवात शेवटच्या दिवशी  काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.अशा अनेकविध वैशिष्ट्यांचा हा सद्गुरू शंकर स्वामी महाराज सप्ताह असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या