Advertisement

Responsive Advertisement

सोयगावसह तालुक्यात गणपती बप्पाच्या अगमनासाठी नागरिकांत उत्सुकता...सोयगाव/विजय पगारे
°°°°°°°°°°°°°°
गणपती बप्पाच्या अगमनासाठी नागरिकांत उत्सुकता दिसून येत आहे. सोयगावशहरासह ग्रामीण भागातील कंकराळा, जरंडी, निबायती,बहुलखेडा,घोसला  अश्या विविध ठिकाणच्या नागरिकांनी मंगळवारी(ता.३०) बप्पाच्या लहान,माेठ्या विविध मुर्तीं घेण्यासाठी एकच गर्दी केल्या दिसून आले. स्थापना अवघ्या १२ ते १५ तासांवर असलेल्याने बाजारपेठ खुलल्या होत्या. बप्पाचे अगमन ता. ३१ ऑगस्ट रोजी हाेत असल्याने नागरिकांची मुर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. 

सोयगावसह तालुक्यात रितीरिवाजाप्रमाणे दरवर्षी नागरिक गणपती बप्पाची प्राणप्रतिष्ठा करतात. विविध भागात व घराेघरी बसवलेल्या बप्पाच्या माेठ- माेठ्या मुर्ती पाहवयास मिळतात. मनाेभावाने या काळात भक्तगण बप्पाची सेवा करतात.  यावेळी बाजारपेठात आलेल्या नागरिकांत मुर्ती खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे. बाजारात लहान,माेठ्या आकाराच्या लालबाग, पगडीवाला आदी नावाच्या मुर्ती पाहवयास मिळत आहे.  
..................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या