Advertisement

Responsive Advertisement

गंगा सिटी मध्ये तिरंगा रॅली जनजागृती संदर्भात ध्वजारोहण..


 धर्माबाद- शहराच्या सौंदर्यात मोलाची भर घालण्यात अतिशय सिंहाचा वाटा असणारे, गंगासिटीचे शिल्पकार तथा मनेरवारलू समाजाचे उभरते नेतृत्व डी. आर. अण्णा कंदकुर्तीकर यांच्या घरातील निसर्गरम्य प्रांगणात आज हर घर तिरंगाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी त्यांनी शहरातील मानांकित व्यक्तीला निमंत्रित केले होते. व तिरंगा रॅलीचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ सल्लागार जे. के. जोंधळे, ओम गंजेवार, सचिन उत्तरवार, साईनाथ उरेकर,  नितीन गुजराती, गंगासिटीचे जेष्ठ नागरिक गौड काका, पत्रकार तथा भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव गंगाधर धडेकर, सुदर्शन वाघमारे, संजय कदम ,सौ. मनीषा कंदकुर्तीकर ,पोलीस व खेळात विशेष प्राविण्य मिळवलेले राजपूत, व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मधुर कंदकुर्तीकर यांनी आपल्या माऊथ ऑर्गनवर देशभक्तीपर गीते गावून दाखवली व उपस्थितांचे मनी जिंकली.
उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश पाटील बन्नाळीकर व नरेश पडगिलवार यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या