Advertisement

Responsive Advertisement

तलवाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जल्लोषात साजरी...


शांताराम मगर.प्रतिनिधी लोणी खुर्द ...


   वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली
  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचे फेट बांधुन सागर करण्यात आले.यावेळी कु.ऊ.बा सभापती भागिनाथ मगर पंचायत समिती उप सभापती राजेंद्र मगर सरपंच पुनम मगर दादाभाऊ मगर भाऊसाहेब मगर गजानन मगर जनार्दन मगर दत्तु मगर संतोष सुर्यवंशी 
ग्रामसेवक आर आर पवार  शांताराम मगर आशिष पढाण.काकासाहेब मगर प्रकाश सोनवणे दादाभाऊ मगर ज्ञानेश्वर मगर द्तु मगर रहिमखाॅ पढाण किशोर मगर नारायण खरात बाळु खरात सुभाष रोकडे बाबासाहेब पेटारे सुरेश पेटारे संजय पेटारे दशरथ सोळसे रघुनाथ पेटारे विजय पेटारे दिपक पेटारे आकाश नवगीरे सागर सोळसे रवींद्र सोळसे गोरख म्हस्के साई बैलम तुळशीराम पेटारे संदीप पेटारे प्रशांत पेटारे राहुल नवगीरे रमेश पेटारे किशोर पेटारे जालिंदर पेटारे रोहित पेटारे सुनील पेटारे सखाहारी पेटारे भिवसन पेटारे गणेश सोळसे संतोष पेटारे रोहित सोळसे गोकुळ पेटारे कृष्णा पेटारेयांची प्रमुख उपस्थितीथी होती.
यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना पंचायत समिती मा उप सभापती राजेंद्र मगर म्हाणाले 
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
शेवटी अध्यक्षीय भाषणात सभापती भागीनाथ मगर म्हणाले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना म्हणाले अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते साठेंच्या लघु कथांचा संग्रह आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये  भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. नाटक, पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील गाणी लिहिली. साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. आसे सांगितले याकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब पेटारे यांच्यासह गावकरी यांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या