Advertisement

Responsive Advertisement

विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई

: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहातजल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे  आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान घेऊन येवो याशब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

             लाडक्या गणरायाचे स्वागत करतानामहाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया,’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

            मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतातउत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणे देखील आवश्यक आहे. आरोग्यशिक्षणपर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी.

            आपल्या सर्वांच्या साक्षीने राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प केला असून, त्याच्यापूर्तीसाठी आपल्या मनातले आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहेअशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

            राज्याच्या विकासाचे मनोरथ पूर्णत्वास जाण्यासाठी आपली साथही हवी आहे. कोरोना संकटामुळे मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हाने येऊ देतत्यांची तमा करायची नाहीअशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करतानामहाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडे घालतोअसे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

००००


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या