Advertisement

Responsive Advertisement

नगरपालिकेच्या दुर्लक्ष मुळे नागरिक त्रस्थ

 हदगाव (ता.प्र.विकास राठोड ) हदगाव शहरातील कदम नगर डोंगरगाव रोड येथील  नैसर्गिक स्रोत पाणी वाहून जात होते तो नाला काही लोकांनी बंद करून पाणी रोडवरून वाहत असून त्या पाण्याने गजानन नामदेव महाजन यांच्या घराच्या  चारही बाजूंनी त्या नैसर्गिक पाण्याने वेडा घातल्याने त्यांना  पाण्याच्या घाण वासामुळे राहणे कठीन होत आहे आणि त्यांचे जिवन मुस्किल झाले,तर कदम नगर,डोंगरगाव, पिंगळी, सह अनेक गावातील वयोवृद्ध लोकांना वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून ठेवण्याची वेळ आली होती अनेक वेळा या पाण्याच्या संदर्भात निवेदन दिली असता त्यानंतर रास्तारोको केला कोणत्याही प्रकारचा परिणाम  न.पा.च्या मुख्यअधिकारी याना जाग अला  नसल्याने वैतागून गजानन नामदेव महाजन यांनी स्वातंत्र्याचा 75 वा अमृत मोत्सव हा  15 ऑगस्ट रोजी ,तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहन करण्याचा इशारा दि 3 ऑगस्ट 2022 रोजी देताच हदगाव न.पा.च्या मुख्यअधिकारी खडबडून जागी झाले ,आणि डोंगरगाव रोडवरील नैसर्गिक स्रोत नाल्याचे पाणी हे डोंगरगाव रोडच्या दोन्ही बाजूंनी नाली काढून येणारे पाणी रामलीला मैदानात काढन्यास यशस्वी झाले "झोपेचे सोंग घेणाऱ्या न.पा.च्या प्रभारी मुखाधिकाऱ्यांना महाजन यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्याचे अली जाग"  खरे पण सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये  डोंगरगाव रोडची रुंदी ही 80 फुटाची असल्याचे समजले परंतु   रोडच्या दोन्ही बाजूच्या नाली खंदल्याने डोंगरगाव रोडवर नालीची माती आल्याने हा 5 फुटाचा रस्ता राहिल्याने कदम नगर,डोंगरगाव सह अनेक गावातील विद्यार्थी, वयोवृद्ध ,माणसाला व वाहनधारकांना चालेने झाले कठीण "आगीतून निघाले फोफुत पडले"  अशी अवस्था मुखाधिकाऱ्यानी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची केल्याने पुन्हा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे, 
नैसर्गिक स्रोत नाला हा कदम नगर मधून अनेक वर्षांपासून वाहत होता तो नाला शासनाच्या 234 गट नंबर मधून जात असल्याचे भूमी अभिलेखाच्या नकाशावर असताना डोंगरगाव रोडच्या दोन्ही बाजूने नाल्याचे पाणी काढल्याने जाणे कठीण झाले तो नाला नकाशाप्रमाणे काढणे शक्य असताना मुख्याधिकाऱ्यांनी नैसर्गिक स्रोत नाल्याला वेगळी वळण देऊन मोकळे झाले खरे पण डोंगरगाव रोडवरून वयोवृद्ध, रुग्ण,विद्यार्थी, वाहनधारकांना करावी लागते कसरत,झालेल्या चिखलात कधी माणूस पडेल सांगता येत नाही,एखादा गरीब विद्यार्थ्यां,वयोवृद्ध माणूस पडून काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे, त्यामुळे नैसर्गिक स्रोत पाण्याच्या नाला हा नकाशाप्रमाणे काढण्यास नपाच्या मुख्यअधिकाऱ्यांना वेळ मिळेल की तात्पुरता काढलेल्या नाला आहे तसाच ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या