Advertisement

Responsive Advertisement

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी शिवसैनिक कटिबद्धशिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांचे प्रतिपादन

नांदेड : जिथे शिवसेना तिथे संघर्ष, त्यामुळे असे संकटं नवीन नाही. त्यामुळे कडवट शिवसैनिक खंबीर आहे. यापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी शिवसैनिक कटिबद्ध राहा. असे आवाहन शिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी केले.
 शिवसेनेशी गद्दारी करून पक्षातून बाहेर पडलेल्या मंडळींकडे फारसे लक्ष न देता ‘जो चला गया उसे भूल जाये’, ही भूमिका घेऊन यापुढे शिवसेनेचे कार्य व विचार जनतेपर्यंत व घराघरांत पोहचविण्याचा संकल्प आपण करूया, असे संकल्प आज मंगळवारी नांदेड येथे केले. शिवसेनेच्या नांदेड जिल्हास्तरीय मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. 
यावेळी संभाजीनगरचे माजी सभापती पूर्व विधानसभा संघटक रेणूकादास उर्फ राजू वैद्य, बीडचे जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, शहरप्रमुख सचिन किसवे, राजू कापसे, पप्पू कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, माजी विरोधी पक्षनेते प्रमोद उर्फबंडू खेडकर, माजी जि. प. सदस्य वत्सला पुयड, निकिता चव्हाण, व्यंकोबा येडे, निवृत्ती जिंकलवाड, बबन बारसे आदींची उपस्थिती होती. शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी नांदेड  गद्दारी केल्यानंतरदेखील आज नांदेडच्या विश्रामगृहावर शिवसैनिकांची झालेली गर्दी ही निश्चितच उत्साहवर्धन असल्याचे पटर्वधन यांनी सांगून गद्दारांच्या जाण्याने आम्हाला काहीही फरक पडणार नाही, यापुढे आता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून गावागावांत ‘घर घर शिवसेना’ हे अभियान राबवायचे आहे. येणाNया काळात ९ विधानसभा मतदारसंघांपैकी किमान सहा ते सात विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकावण्यासाठी सिद्ध व्हा, पक्ष-संघटना मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, बाळासाहेब देशमुख, सहसंपर्वâप्रमुख प्रकाश मारावार, भुजंग पाटील यांच्यासह शिवसेनेच्या तालुका पदाधिकाNयांनी व कार्यकत्र्यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे आमदार व खासदार यांनी पक्षाशी गद्दारी केल्यानंतरदेखील शिवसेनेच्या झालेल्या या बैठकीला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या