Advertisement

Responsive Advertisement

तालुकास्तरावर दक्षता व नियंत्रणसमित्यांची दरमहा बैठक घ्या- डॉ. अनंत गव्हाणे


औरंगाबाद, दिनांक 29 :  अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्हास्तरावर जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आढावा घेत असते. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तालुकास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीने नियमित बैठका घ्याव्यात. बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी व समाज कल्याण विभागाला पाठवावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त पी.जी.वाबळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवाजी केंद्रे, पोलिस उपअधीक्षक अनुराधा भालेराव, एस.जी.कदम, सहायक पोलिस निरीक्षक राजेश घोळवे उपस्थित होते.
जुलै महिन्यात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एक खून, ग्रामीण पोलिस हद्दीत दोन बलात्कार व एक विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचे श्री. वाबळे यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणांचा तपास लवकर करावा, अशा सूचना श्री. गव्हाणे यांनी दिल्या.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या