Advertisement

Responsive Advertisement

माळेगाव येथे "हर घर तिरंगा "अभियान जनजागृती रँली संपन्न.


सोयगाव / विजय पगारे
~~~~~~~~~~~~
ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव ता.सोयगाव यांच्या संयुक्त विघमाने गावात जनजागृती रँली काढण्यात आली .
सोयगाव तालुक्यातील मौजे माळेगाव /पिंप्री येथे (ता. ९ ) स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव योजनेअंतर्गत  १३ ते १५ आँगस्ट "हर घर तिरंगा " या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,अंगणवाडी ,संघटन महिला ग्राम संघ,यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती रँली काढण्यात आली. गावातील लोकनियुक्त सरपंच दादाभाऊ जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील. व सर्व सदस्य, मुख्याध्यापक पी.पी.साळुंखे., शिक्षक नरेंद्र बारी ,केंद्रप्रमुख जी.आर.पाटील,पोलिस पाटील,महिला ग्राम संघ सदस्या, गावातील जेष्ठ नागरिक, शिक्षण प्रेमी, माजी विध्यार्थी. मुख्याध्यापक यांनी यावेळी माहिती सांगितली. शिक्षक बारी  यांनी मान्यवरांचे आभार मानले. शाळेत सामुहिक राष्टगीत गायन करण्यात आले.रांगोळी स्पर्धा सुध्दा घेण्यात आली.अशा विविध उपक्रम राबवत कार्यक्रम साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या