Advertisement

Responsive Advertisement

हर घर तिरंगा रॅलीत दिड हजार विद्यार्थी...सोयगांव नगर पंचायत चा उपक्रम ...


सोयगाव/विजय पगारे -   स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करण्यासाठी सोयगांव नगर पंचायत मार्फत सोमवारी (ता. ८) सोमवारी  काढण्यात आलेल्या रॅली मध्ये शहरातील विविध शाळेतील सुमारे दिड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
      स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकविन्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याकारिता विविध उपक्रम राबविले जात आहे. सोयगांव नगर पंचायत मार्फत" हर घर तिरंगा "रॅली चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जि. प. प्रशाला, नॅशनल हायस्कुल, जि. प. केंद्रीय शाळा, कै. बाबुरावजी मेमोरियल स्कुल, प्रगती उर्दू हायस्कुल, अजंता व्हॅली इंग्लिश स्कुल या शाळेतील सुमारे दिड हजार विद्यार्थी व विद्यार्थिनीं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाबाई काळे नगरसेविका कुसुम दुतोंडे,संध्या मापारी सविता जावळे, सुलताना देशमुख,नगरसेवक संतोष बोडखे, भगवान जोहरे, हर्षल काळे,यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उदघाटन करण्यात आले. तर पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या उपस्थितीत समरोप करण्यात आला.मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.मुख्याध्यापक गिरीश जगताप,अमजद पठाण, रामदास फुसे, ज्ञानेश्वर एलीस, भास्कर पिंगाळकर  नगर पंचायत चे ईश्वर शिमरे ,भगवान शिंदे,राजू जनजाळ,राजेश मानकर,समाधान गायकवाड, सारंग बागले,दीपक राऊत,दिनेश हिवाळे,सर्व अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस,अशासेविका, सफाई कामगार यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या