Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त गोधळी कलावंतांचा सन्मान...

   
सोयगाव / विजय पगारे
>>>>>>>>>>>>>>>>
 ्प्राथमिक शाळा रामजीनगर - सोयगाव येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त सन्मान लोक कलावंताचा या उपक्रमांतर्गत गोंधडी कलावंत ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल शिंदे,सुनिल शिंदे या गोंधडी कलावंतांचा सोयगांव केंद्राचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय जोहरे यांनी (ता.११) गुरुवारी केला.
यावेळी लोक कलावंतांनी विद्यार्थी,शिक्षक,पालक,शाळा, केंद्र प्रमुख यांची नावे अचूक ओळखली,छञपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सहअभिनय सादर करुन विद्यार्थांना ही कला छञपती शिवाजी महारांजाच्या काळा पासून चालत आलेली असून या लोककले बद्दल माहीती देऊन कलेसाठी लागऱ्यांना साहीत्यांची माहीती दिली.ही कलापाहून विद्यार्थीही भारावूऊ अंचबिंत झाले होते. दरम्यान केंद्र प्रमुख फिरोज तडवी,मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले तर सहशिक्षक आसिफ देशमुख यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या