Advertisement

Responsive Advertisement

यांत्रिकच्या काळात बैल जोडी पाळणे झाले मुश्किल...?

  सोयगाव/विजय पगारे
  °°°°°°°°°°°°°°°°°°°°°  
शेतीत यांत्रिकीकरण आल्यानंतर आता नांगरणी, वखरणी, पेरणी यांसारखी कामेही यंत्राद्वारे होतात. बलांची संख्याही  कमी होऊ लागली आहे. जे लहान शेतकरी आहेत त्यांना दोन-चार एकर जमिनी च्या मशागती साठी वर्षभर एखादी बैलजोडी पोसणे शक्य नाही आणि ते व्यवहार्यही नाही. चारा पाणी, देखभालीचा खर्च झेपत नाही अशा वेळी. शेतात काम असो, नसो बैल सांभाळण्यासाठी स्वतंत्र माणूस गुंतून पडतो हेही परवडणारे नसते. मोठय़ा शेतकऱ्यांना जास्त जमीन कसण्यासाठी तर वेळ, श्रम या सर्वच गोष्टींच्या बचतीसाठी ट्रॅक्टर परवडते. त्यामुळे आता कृषी व्यवस्थेतूनच बैल बाजूला होत आहेत.
आजही काही शेतकरी ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हाताऱ्या बैला ची करतात सेवा
मात्र काही शेतकऱ्यांकडे याहून उलट परिस्थिती आहे निव्वळ परोपकारी भावनेतून अजूनही घरच्या गायीचे बैल असतील आणि त्यांनी एकाच शेतमालकाकडे जर आपली हयातभराची राबणूक केली असेल तर म्हातारपणाला आलेले असे बैल विकले जात नाहीत. तो आज काहीच काम करीत नसला आणि त्याला बसल्या जागीच वैरणपाणी द्यावे लागले तरीही त्याचे ओझे मानले जात नाही. मरेपर्यंत तो सांभाळला जातो. जी गोष्ट उपयोगाची नाही ती गोष्टही जतन करावी, ज्याचे आपल्याला काम नाही अशा म्हाताऱ्या बैलाला कुणी लगेच बाजार दाखवत नाही. अखेर ज्या शेतात बैल राबला त्याच शेतात त्याची माती होते. 
        
-यांत्रिकीकरण झाल्याने अन बैल पोसने जड जाऊ लागल्याने ग्रामीण भागात झपाट्याने बैलजोड्याची संख्या घटली आहे.
शेतीकाम आले कि बैले व औजारे आलेच..पण कालौघात हि जागा यंत्राने घेतली आहे.यांत्रिकीकरण वाढल्याने बैलांची संख्या घटली आहे.अर्थात याला चारा टंचाई, बैलांच्या किमती, त्यांना पोसण्यासाठी येणारा खर्च आवाक्याबाहेर गेल्याचेही कारणेही यामागे आहे.शेतातील नांगरणी,वखरणी,कुळपणी,पेरणी, मळणी यासारखी अनेक कामे करण्यासाठी ट्रॅक्टर व त्याच्या औजारांचा वापर वाढला आहे.आता बऱ्याच शेतकऱ्यांनि  ट्रॅक्टर घेतला असून ,दुष्काळ असूनही छोट्या-मोठ्या ट्रॅक्टरने शेती केली जात आहे.ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या अधिक आहे पण बैलांची संख्याही टिकून आहे. दोघे मिळून जोडी घेणे,बैले असलेल्या मोबदला देऊन आपले कामे करून घेणे असे पर्याय वाढले आहेत.  
आता संख्या घटली मात्र बैलपुजाची संस्कृती टिकून आहे,बैले नसलेले शेतकरी भाऊबंद,नातेवाईक, शेजारी किंवा हितसंबंधीतांचे बैले घरासमोर आणून त्याची मनोभावे पूजा करत असल्याचे चित्र आहे.तर सर्वच शेतकरी मातीच्या बैलांची पूजा करतातच.
            शेतकरी;-
आधुनिक यंत्र सामग्रीने शेती व्यापली असून शेतकरी बैलाची विक्री करतात.पण  आमच्या कडे फक्त ४ ते ५ एकर शेती असल्याने २ ते ३ लाखाचा ट्रॅक्टर घेणे शक्य नाही. यंत्रापेक्षा शेतीच्या मशागतीला बैल जोडी योग्य वाटते.शेतात ज्या ठिकाणी यंत्र नाही जाऊ शकत त्या ठिकाणी बैल जाऊन शेतीची मशागत, नांगरणी, वखरणी करतात.त्यामुळे आजही मी बैलानेच शेती करणे पसंत करतो.” 
:- भागवत थोटे पाटील भवानी नगर सोयगाव शेतकरी

 प्रतिक्रिया
माझ्या कडे तीन एकर शेती आहे त्या साठी ५९ ते ६९ हजाराची बैल जोडी ठेवणे परवडणारे नाही ,आणि त्या बैल जोडी साठी किमान एक एकर तरी क्षेत्र चाऱ्यासाठी राखीव ठेवावे लागते ते वय व्यवहारिक दृष्टया परवडणारे नाही,व त्या जोडी साठी मला वर्षभर कुठलेही इतर कामासाठी जाता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत होती .,पावसाच्या लहरी पणा मुळे वर्षभर शेती करणे शक्य नाही. त्यातून माझ्या उदरनिर्वाह देखील होत नव्हता. मी बैल जोडी विकून मी आता पूर्ण वेळ शेती नकरता हंगामी शेतीची  कामे करून इतर कामे करत आहे. कधी काळी मी  बैलांसोबत राबलो आहे, बैलांच्या चारापाणी केला आहे,  दिले असेल आणि कधी पाठीवरून हातही फिरवला आहे आणि आज मात्र घरासाठी माती चे बैल आणून पूजा करताना डोळ्यात अश्रू येतात.
    :-  दगडू हनमंते शेतकरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या