Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव शहरात मंगळवारी झाले राष्ट्रगीताचे सामुहिक गायन..

सोयगाव/विजय पगारे
------------
 'आझादी का अमृतमहोत्सव'अंतर्गत 'घरोघरी तिरंगा' अभियानाबाबत तालुकाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशाने पंचायत समिती कार्यालयाने चित्ररथाची निर्मिती केली आहे. चित्ररथाच्या माध्यमातून मतदार आधार प्रमाणिकरण कार्यक्रम आणि कोविड लसीकरण अमृत महोत्सवाची देखील जनजागृती करण्यात येणार आहे.
 या चित्ररथाला सोयगाव तालुक्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी (ता.९) मंगळवारी हिरवी झेंडी दाखवली. पंचायत समिती कार्यालयांच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. पंचायत समिती सोयगावचे गटविकास अधिकारी पी.व्ही.नाईक,सोयगाव पोलीस स्टेशनचे एपीआय अनमोल केदारे , सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ता.९ मंगळवार हा क्रांतीदिन असल्याने " स्वराज्य महोत्सव " मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 
महोत्सवांतर्गत सकाळी ११ वाजता संपूर्ण शहरातील जिल्हा परिषद प्रशाला, बाबुरावजी काळे विद्यालय, प्रगती उर्दू हायस्कूल, नॅशनल मराठी हायस्कूल, अजंता व्हॅली इंग्लिश स्कूल सोयगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमखेडा शाळेचे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायनाने उपक्रम राबविण्यात आला.बालविद्यार्थींनी विविध वेशभूषा परिधान केल्याने मोठे आकर्षण पहावयास मिळाले,  ग्रामीण भागातील शाळा ग्रामपंचायत विविध शासकीय कार्यालय व नागरिकांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन करुन उपक्रम सहभागी व्हायचे हर घर तिरंगा हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा लागल्या जाणार आहे,गावागातील ग्रामपंचायत कार्यालयात नागरीकांसाठी " तिरंगा राष्ट्रध्वज " अल्पदरात उपलब्ध करन देण्यात आले आहेत. या कालावधीत घरे व शासकीय कार्यालये तिरंगा ध्वजारोहण केल्या जाणार आहे. देशाअभिमान बाळगुन ध्वज संहितेचे पालन करावे असे आवाहन सोयगाव तालुक्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी यावेळी केले .
दरम्यान नॅशनल मराठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुमारी तनुश्री खैरनार,साक्षी राठोड, शुभांगी काळे यांनी सुरेख आवाजात सर्व उपस्थितांना सामुदायिक राष्ट्रगीत गायन गहन करवून दिले.तर कुमारी तनुजा जोशी हीने कर्मा सिनेमातील देशभक्तीपर गीत सादर केले सर्व उपस्थित यावेळी भाविकांनी होत मंत्रमुग्ध झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या