Advertisement

Responsive Advertisement

परिसरात मक्याच्या पोंग्या सह लष्करी अळीचा आता कोवळ्या कन्सावरही हल्ला .....

सोयगाव/विजय पगारे
------------------
 तालुक्यातील बनोटी,वाडी, किन्ही,हनुमंतखेडा,गोंदेगाव, वरठाण, घोसला,कौली,बहुलखेडा,निंबायती,जरंडी परिसरात अस्मानी सुलतानी संकटाच्या चक्रात दरवर्षी शेतकरी सापडत असून यंदा मका पिकावर  सोयगावसह परिसरात लष्करी  अळीचे आक्रमण झाल्याने मक्का उत्पादक शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.त्यामुळे मक्का उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहेत सोयगाव परिसरात एकून सहा हजार हेक्टरवर खरीप पिकाची लागवड यंदा झाली आहेत.यात जवळपास साठ टक्के मक्का या पिकाची जास्त लागवड झालेली आहे. मात्र यावर्षी या पिकावर लष्करी अळीने आक्रमण मोठ्या प्रमाणावर केलेले पाहावयास मिळत आहे. मका पिकाला अळीपासून वाचविण्यासाठी बळीराजा महागड्यातल्या महागडी  कीटकनाशके फवारणी करत आहे.एवढे करूनही ही लष्करी अळी जात नसल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.परिसरात सद्यस्थितीत मका हे पीक आता तुरे काढण्याच्या मार्गावर असून या पिकाला ही लष्करी अळी चाळणी करून ठेवत असल्याने मका उत्पादन घेणे शेतकऱयांना जिकरीचे होणार आहेत.याशिवाय  मक्याच्या पोंघ्या सह लष्करी अळीचा आता कोवळ्या कन्सावरही या अळीने आक्रमण केल्याने परिसरातील शेतकरी दुहेरी चक्रव्यूहात सापडला आहेत.उत्पन्न निघेपर्यंत अजून किती संकट शेतकऱ्यांवर ओढवले जातील हे सांगणे शेतकऱयांना जिकरीचे झाले आहेत.नाकापेक्षा मोती जड झाल्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहेत. या लष्करी  अळिने  सोयगाव तालुक्यात थैमान घातल्याने  तालुक्यातील    बऱ्याचशा शेतकऱ्यांना मक्का पिकात नांगर चालवण्याचे संकट ओढवले आहे त्यामुळे अळीच्या संकटाने शेतकरी चिंतेत पडला आहेत मका हे पीक नगदी पिक असून मागील वर्षीपासून या पिकाला चांगला भाव मिळत असल्याने त्यामुळे शेतकरी वर्ग या पिकांकडे वळल्याने मका या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी प्रतिक्रिया :

भागवत थोटे शेतकरी 
:मी माझ्या शेतात चार एकर मकाची लागवड केलेली असून सुरुवातीपासूनच या पिकाला लष्करी अळीने ग्रासल्ल्याने महागड्या औषधी फवारणी व कारबो मोठा खर्च झाला.त्यात आता कणसावरही आक्रमण केल्याने हे पीक आता हातात येते की नाही याचा भरोसा राहिलेला राहिलेल्या नाही. यामुळे मोठी चिंता वाटत आहे

फोटो ओळ:
सोयगाव परिसरात मका या पिकाची लष्करी अळीने अक्षरशा चाळणी करून ठेवली आहेत त्यात आता कोवळ्या  कन्सावरही अळीने आक्रमण केले आहे.(छायाचित्र: विजय पगारे )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या