Advertisement

Responsive Advertisement

विजयी विश्वती तिरंगा प्यारा ...! झेंडा उंचा रहे हमारा ...! घोषणांनी सोयगाव शहर परिसर दुमदुमला...

 सोयगाव /  विजय पगारे                          ~~~~~~~~~~~~~                     हर घर तिरंगा झेंडा या उपक्रमाची     जनजागृती साठी सोयगांव शहरात जिल्हा परिषद प्रशाला सोयगांव येथील  इयत्ता ५ वी ते १० च्या विद्यार्थी , विद्यार्थीनी (ता.८) सोमवारी प्रभात फेरी  " विजयी विश्वती तिरंगा प्यारा ...! झेंडा उंचा रहे हमारा ...! काढत.विजयी जय घोषणांनी अख्खं शहर दुमदुमले. 
जिल्हा परिषद प्रशाला शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनींनी पंचायत समिती,बस स्टॅण्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्मिकीपुरा ते पोलीस स्टेशन गावातील चाळी चाळीत घरा-घराच्या शेजारुन हर घर तिरंगा झेंडा आदर्श सहीता चे पालन करुन उपक्रम गावकऱ्यांनी प्रभावी पणे राबवावा करिता वाजत गाजत ढोल ताशे,  घुंगरु काठी, लेझीम प्रभात फेरी-पायी रॅली काढली " हर घर में एक ही नारा " " सबसे उंचा तिरंगा हमारा " " भारत माता की जय",  " ईस्ट और वेस्ट " इंडीया ईच द बेस्ट" , " विजयी विश्वती तिरंगा प्यारा ...!"  "झेंडा उंचा रहे हमारा ...!'  " भारत हमारी जाॅन है "  " तिरंगा हमारी शान है ". " सोना नदीला धो...धो...पाणी" " हम सब बच्चे है हिंदूस्थानी " आदी विजयी जयघोषात सोमवारी सोयगाव परिसरातील प्रत्येक वार्ड वार्ड विद्यार्थांनी दुमदुमून सोडला.      शाळेच्या मुख्याध्यापक गिरीष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी हर घर तिरंगा अभियानाचे  घोषवाक्य बनवून आणले होते. घोषवाक्य व घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडला होता. या रॅलीत जि.प.प्रशाला मुख्याध्यापक गिरीष जगताप , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल नवगिरे , उपाध्यक्ष विष्णु मापारी , जयकृष्ण नाईक , सुकदेव पाटील , अशोक पवार , दौलतसिंग परदेशी , शिवाजी नवले . अनिल ठाकुर , पंकज रगडे ,  संजीव जोशी , विद्याधर बागुल ,  वर्षा रामटेके , वैजीनाथ सावळे , प्रविण चावळे , सुनील शेटे , अरुण जगदाळे ,सुधाकर निबांळकर प्रामुख्याने सहभागी होते .
या रँलीत सोयगांव शहरातील सर्व पत्रकार बंधु ,  सर्व शाळा , नगरपंचायत , पोलिस स्टेशन , ग्रामस्थ सहभागी होते .
प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकांच्या घरावरती तिरंगा ध्वज अभिमानाने फडकला जावा यासाठी संपूर्ण शहरात जनजागृती केली.  पंधरा तारखेपर्यंत रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा यासारख्या अनेक उपक्रमांनी जनजागृती करण्याचे नियोजन शाळेच्या वतीने केलेले आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने या जनजागृती रॅलीत सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या