Advertisement

Responsive Advertisement

आमदार बंब यांच्या शिक्षक विरोधी वक्तव्याचा निषेध...

सोयगाव/विजय पगारे
``````````````````````````
आमदार प्रशांत बंब यांनी विधान सभेत बोलतांना खेड्यापाड्यात,वाड्यावस्त्यांवर ज्ञानदानाचे पविञ कार्य करणार्या शिक्षक बंधू ,भगिनींचा अपमान करणारे वक्तव्य केले असून या शिक्षक विरोधी वक्तव्याचा शिक्षक भारती,सोयगांव कडूून निषेध करण्यात आला असुन आमदार प्रशांत बंब यांनी तमाम शिक्षक बंधू,भगिनींची माफी मागावी.शिक्षक विरोधी वक्तव्या बाबत शिक्षक भारती,सोयगांव कडून आमदार प्रशांत बंब यांचा निषेध

विधानसभे मध्ये बोलतांना गंगापूर विधानसभेचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकां विरोधी वक्तव्य केले.असे वक्तव्य करून आमदार महाशयांनी ज्ञानदानाचे पविञ कार्य करणार्या तमाम शिक्षक बंधू,भगिनींचा अपमान केला असून या शिक्षक विरोधी वक्तव्याचा सोयगांंव तालुक्यातील शिक्षकांनी  शिक्षक भारती तालुका शाखा सोयगांव तर्फे सोयगांव तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.यावेळी निवेदन देतांना शिक्षक भारतीचे मार्गदर्शक प्रकाश वंजारी,प्रताप सांळूके, नरेंद्र बारी,झगाजी पोतरे,सुभाष सोनवणे,शिक्षक भारती तालुकाध्यक्ष किरणकुमार पाटील, कार्याध्यक्ष महेश गवांदे,किशोर जगताप,गणेश बावस्कर,शिक्षण सेवक तालुकाध्यक्ष नितेश गव्हांदे,व्ही.आर.सावळे,डी.एस.राठोड,मिलींद कोल्हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या