Advertisement

Responsive Advertisement

सध्याचे सरकार कॉपीपेस्ट करण्यात पटाईत - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

औरंगाबाद(प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षात जनतेची कामे केली. त्यामुळे ते देशात पहिला पाच यशस्वी मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले. मात्र आताचे सरकार
जुन्याच योजना आणि शासन निर्णय नवे करून श्रेय घेत आहे. म्हणून सध्याचे सरकार कॉपीपेस्ट करण्यात पटाईत असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील एन ६ सिडको येथे विकामकामांचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
बंडखोर आमदार अडीच वर्षे कामे करूनही मूग गिळून गप्प होते. विकामकामांची आकडेवारी समोर आली तर हिंदुत्वाचा मुद्दा समोर करत आहे. मंत्रिपद नाही मिळाले तर थयथयाट करत आहे, नेमके यांच्या अपेक्षा काय आहे, हे जनतेला कळू द्या. ज्यांनी आपल्याला बाराखडी शिकवली. त्यानांच बेरीज वजाबाकी शिकवण म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. जनतेला सर्व माहिती आहे, मात्र आता ते मतदानाची वाट पाहत आहे. त्यामुळे आता लवकरच हे सरकार आपआपसात भांडून कोसळेल, असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला.
यावेळी मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, उपशहरप्रमुख अनिल जैस्वाल, राजू खरे, उद्योजक ज्ञानेश्वर खर्डेअप्पा, ऍड. चंद्रकांत गवई, महिला आघाडी उपजिल्हा संघटक जयश्री लुंगारे, शहरसंघटक विद्या अग्निहोत्री, उपशहर संघटक सीमा गवळी,  अंजना गवई, मनीषा बिराजदार, विभागप्रमुख रघुनाथ शिंदे, साहेबराव घोडके, शाखाप्रमुख अमोल गव्हाड, शिवा खंडकुळे, लक्ष्मण गिरे आदीसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या