Advertisement

Responsive Advertisement

अवैद्य वाळू साठ्यांचे पंचनामे करून दोषींसह सबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठीचे आमरण उपोषण , तिसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर तुर्तास मागे...

सोयगाव / विजय पगारे
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

सोयगाव तालुक्यात गौण खनीज व अवैद्य वाळू माफियांची दहशत वाढली असून   अनेक  ठिकाणी अवैद्य वाळू साठे पडून आहेत. तर  अवैद्य गौण खनिज  उत्खनन करून सुरु असलेल्या चोरटी वाहतूक विरोधात भरारी पथक व महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने ईश्वर इंगळे यांनी सोमवारी ता. १५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  तहसील कार्यालयासमोर प्राणांतीक आमरण उपोषनास बसुन महसूल विरूद्ध  आंदोलन छेडले  होते. तालुका महसुल चार लाचखावू कारभार चव्हाट्यावर आला आहे. उपोषणा बाबत महसूल प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने तालुक्यात तिव्र संताप व्यक्त करण्यात आला.
माफीयांना अधिकारी आणि कर्मचारी पाठीशी घालुन प्रकरण दडपण्याचा व महसूलच्या अधिकाऱ्यांवर आलेल्या राजकीय दबावामुळे उपोषण लांबू देत असल्याची चर्चा तहसील कार्यालयात रंगली होती. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी ता.१७ अकरा वाजेदरम्यान  उपोषणार्थी ईश्वर इंगळे यांची तब्येत खालावल्याने एकच खळबळ उडाली होती. उपोषण स्थळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय निरगुडे यांनी इंगळे यांची वैद्यकीय तपासणी केली. त्याच वेळी नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांनी पंधरा दिवसांत पंचनामे करून योग्य ती चौकशी करून वाळू माफिया विरुद्ध कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने यांच्याहस्ते लिबुशरबत घेत उपोषणाची सांगता करण्यात आली. या वेळी महसुलचे कर्मचारी  उपोषणाचा पाठिंबा देणारे पत्रकार बांधव यांची उपस्थिती होते.
----------------------------------------------------------------------
चोखट 

ईश्वर इंगळे यांची तब्येत खालावल्याने  महसुलने विभागाने येत्या पंधरा दिवसात चौकशी करून गुन्हा दखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तुर्तास उपोषण मागे घेण्यात आले.  तात्काळ इंगळे यांना पुढील उपचारासाठी पत्रकार बांधवानी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वैद्यकीय अधिकारी  डॉ. धनंजय निरगुडे यांनी त्यांच्यावर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या