Advertisement

Responsive Advertisement

हिंद मराठा महासंघ खान्देश प्रदेश अध्यक्ष पदी सोपान गव्हांडे पाटील

सोयगाव/विजय पगारे
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
सोयगाव तालुक्यातील घोसला येथिल समाजसेवक तथा मराठा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थापकीय अध्यक्ष युवक सोपान गव्हांडे (पाटील) यांची हिंद मराठा महासंघ खान्देश प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाली,या निमित्ताने सोयगाव तालुक्याभरातुन स्वागत करण्यात आले आहे.
हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम यांच्या सूचनेनुसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी सोपान पुंडलिक गव्हांडे पाटील यांची निवड महाराष्ट्रचे प्रदेश कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
 यावेळी बोलतांना समाज नेते उद्योजक हिंद मराठा महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे यांनी सांगितले की, कोरोना महामारी काळात रुग्णांसाठी ४ रुग्णवाहिका त्यांनी मोफत चालवल्या मराठा प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष पदी नियुक्ती २०१२ साली त्यांनी समाजाला उपयुक्त काम केले आहे, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेसह मोफत वह्या वाटप, उन्हाळ्यात पाण्याचे हौद सोयगाव तालुक्यात बांधले असून ,तर घोसलागाव पाणी टंचाई मुक्त केले. घोसलागावत  कोरोणा योद्धा म्हणून शासनाने यांना सन्मानित केले असुन विविध प्रकारचे सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. सोपान गव्हांडे पाटील यांचा निवडीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. लवकरच धुळे येथे हिंद मराठा महासंघाचा उत्तर महाराष्ट्र भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खान्देश विभागीय अध्यक्ष सोपान पुंडलिक गव्हांडे पाटील यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष वकील आनंदराव भोसले, राष्ट्रीय सचिव देवेश माने, गुजरात राज्य अध्यक्ष प्रदीप मोरे, कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण, राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव, राज्य सरचिटणीस संजय जाधव, कोकण महीला प्रदेशाध्यक्षा सौ. ज्योती लक्ष्मणराव भोसले, मुंबई प्रदेश महीला प्रदेशाध्यक्षा श्रीमती भक्ती भार्गव भोसले, हिमाचल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत वाघ, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष आनंदराव घोरपडे, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अंकुश चाळके, सचिव रामचन्द्र गायकवाड आदी मान्यवरांसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या