Advertisement

Responsive Advertisement

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ध्वज विक्रीचा शुभारंभ...


धर्माबाद - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १३ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम भव्य दिव्य स्वरूपात राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बचत गटांना  सुद्धा छोटेसे अर्थसहाय्य मिळावे या भावनेने बचत गटांच्या माध्यमातून तिरंगा ध्वज विक्री करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्याप्रमाणे तालुक्यातील बचत गटांच्या माध्यमातून ध्वज विक्री करण्यात येणार असून प्रती ध्वज ३० रुपये दर ठरविण्यात आला आहे. प्रत्येक गावातील बचत गटांतर्फे,ग्रामपंचायती समोर ध्वज विक्री केंद्र असणार आहे. काल नगर परिषदेच्या प्रांगणात ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.
  यावेळी पंचायत समिती चे गट विकास अधिकारी कैलास बळवंत साहेब, संदीप गादेवर, डि.जी. खंडागळे, मस्के, तसेच इतर कर्मचारी व बचत गटाचे महिला मंडळ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या