Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2022 चे सर्व साधारण विजेत पद औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दला कडे …

औरंगाबाद -
दिनांक 15/9/2022 ते 20/9/2022 या कालावधीत औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2022 चे   के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली  व  मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, . डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक  यांचे नियोजनात दि. 15/09/22 पासुन विभागीय क्रिडा संकुल, गारखेडा, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण, जालना, उस्मानाबाद,बिड, पोलीस आयुक्त,औरंगाबाद शहर असे पाच संघानी 16 खेळ प्रकारात एकूण 514 खेळांडुनी सहभाग नोंदविला होता.
 पोलीस क्रीडा स्पर्धा -2022 मध्ये हॉकी, फुटबॉल, हॅन्डबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, कुस्ती, ज्युदो, वेट लिफटींग, बॉक्सींग,त्वायक्वाँदो, वु-शु, जलतरण, 10 कि.मी.  5000 मीटर, 800 मीटर, 400 मी, 200 मी. 100 मी धावणे, रिले, हॅडल्स, ट्रिपल चेस, अशा विविध श्रेणीमध्ये खेळांडुनी आपले खेळातील कौशल्ये दाखवित विजेते तसेच उपविजेते पद पटकावले आहे.

यामध्ये औरंगाबाद ग्रामीण पोलीसांनी यजमान पद स्विकारून या सर्व स्पर्धांचे नियोजन केले होते.
खेळाडुनी अत्यंत खेळाडु वृत्तीने खेळांचे प्रदर्शन करून सचोटीने व धिरेरीने यात सहभाग नोदवत पदकांची लुट करत आप- आपल्या जिल्हा पोलीस दलाचे नावलौकिक करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.

आज दिनांक 20/9/2022 रोजी या 34 व्या औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे समारोप गोकुळ मैदान, पोलीस मुख्यालय, औरंगाबाद ग्रामीण येथे आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणुन मा. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर, मा. के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे सह श्री. अविनाश साबळे, 3000 मीटर स्टीपलचेस,कॉमनवेल्थ गेम-2022 मधील रौप्य पदक विजेते यांची विशेष उपस्थितीती होती.

यावेळी उपस्थितीताना मार्गदर्शन करतांना मा. के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, यांनी सांगितले कि, पोलीस कायम बंदोबस्तात व्यस्त असतात त्यामुळे आरोग्याकडे हवा तसा वेळ देता येत नाही. परंतु सुदृढ आरोग्या करिता दररोज खेळ खेळणे अत्यावश्यक आहे. खेळामुळे टिमवर्क व चांगले काम करण्यासाठी उत्साह वाढतो. दिर्घ व चांगले आयुष्य जगण्यासाठी दैनंदिन जिवनात खेळ अत्यावश्यक घटक आहे. पोलीस हा कायम दगदगीचे जिवन व्यतीत करत असतो यामुळे त्यांना ब-याच व्याधींना सामोरे जावे लागते.  या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमांतुन त्यांना प्रोत्साहित करण्याचा एक प्रयत्न आहे.

याचप्रमाणे अध्यक्षीय भाषणामध्ये मा. डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त यांनी पोलीसांना गणवेशा व्यतिरिक्त स्पोर्ट ड्रेसमध्ये बघुन आनंद व्यक्त केला. तसेच पोलसांची डयुटी ही सर्वात कठीण डयुटी असल्याने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याबाबत मत व्यक्त केले. तसेच सर्व खेळाडुसह औरंगाबाद शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले कि प्रत्येकांनी दिवसभरातील दिनचर्यामधील एक तास हा स्वत:च्या व्यायामा करिता देणे आवश्यक आहे. या संदेशामुळे प्रत्येक नागरिक हा सदृढ व निरोगी जिवनासह आपल्या कुटूंबाला चांगले आरोग्य देण्यास सक्षम राहिल.

या स्पर्धा मध्ये पुरुष औरंगाबाद ग्रामीण संघाने 182 गुण , औरंगाबाद शहर संघाने 138 गुण, बीड संघाने 113 गुण, जालना संघाने 75 गुण, तर उस्मानाबाद संघाने 39 गुण तर महिला खेळाडूंमध्ये औरंगाबाद ग्रामीण 162 औरंगाबाद शहर 128 बीड 28 जालना 26 उस्मानाबाद 17 असे गुण प्राप्त केले आहे.

औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील खेळांडुनी अतीशय उत्साहवर्धक खेळांचे प्रदर्शन करत आपल्या प्रतिस्पर्धी जिल्हयाचे खेळाडुचे आवाहान मोडीत काढले. प्रत्येक श्रेणीतील खेळांत आपले प्राविण्य सिध्द करत प्रतिस्पर्धांना चित केले आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात औरंगाबाद जिल्हा पोलीसांनी शेवट पर्यंत सामना जिकण्यासाठी कडवी झुंज देत विजेता पदाला गवसणी घातली आहे. खेळाडुच्या याच खेळाडुवृत्तीने
 *औरंगाबाद जिल्हा पोलीस दलास सर्वांधिक 182 गुण प्राप्त करुन 34 व्या औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2022 चे सर्व साधारण विजेत पद (जनरल चॅम्पियनशिप) तसेच 162 गुणांसह महिला जनरल  चॅम्पियनशिप सुद्धा  औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलास असा दुहेरी बहुमान मिळाला आहे. मा. विशेष अतिथी यांचे हस्ते चॅम्पियनशिप ची ट्राफी व इतर बक्षिसे औरंगाबाद ग्रामीण पोलीस संघास   देण्यात आली आहे.* 

*तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष रियाज शेख,औरंगाबाद शहर पोलीस दल, चार गोल्ड मेडल, सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला अनुराधा ठोंबरे जालना पोलीस दल, या विजेत्याना  दोन मोटर सायकल बक्षीस स्वरूपात देण्यात आले आहे.* 
  विजेत्या खेळाडुना मोटरसायकल बक्षिस देण्यासाठी  स्पॉन्सर म्हणून  मा. आशिष जेवुरकर व रोहित पाटील, स्टेरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड, शेद्रा
शैलेन्द्र कुमावत प्लन हॅड,  व्हॅरॉक पॉलीकॉन शेद्रा, इरफान खान कॉस्मो फिल्म. यांची विशेष मदत झाली आहे.

 सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये खालील प्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले.
 खोखो पुरुष गट प्रथम क्रमांक उस्मानाबाद द्वितीय बीड
 खोखो महिला
 प्रथम क्रमांक औरंगाबाद ग्रामीण द्वितीय क्रमांक औरंगाबाद शहर
 हॉलीबॉल पुरुष
प्रथम बीड जिल्हा
 द्वितीय औरंगाबाद शहर,
 हॉलीबॉल महिला गट
 प्रथम क्रमांक औरंगाबाद शहर
 द्वितीय क्रमांक उस्मानाबाद
 कबड्डी पुरुष गट
 प्रथम क्रमांक औरंगाबाद शहर
द्वितीय क्रमांक औरंगाबाद ग्रामीण
 कबड्डी महिला गट
 प्रथम क्रमांक औरंगाबाद ग्रामीण
द्वितीय क्रमांक औरंगाबाद शहर
 हँडबॉल पुरुष
 प्रथम क्रमांक बीड
द्वितीय क्रमांक औरंगाबाद शहर
 हॉकी पुरुष
 प्रथम क्रमांक औरंगाबाद शहर
द्वितीय क्रमांक औरंगाबाद ग्रामीण
 फुटबॉल
प्रथम क्रमांकजालना
द्वितीय क्रमांक औरंगाबाद शहर
 बास्केटबॉल पुरुष
प्रथम क्रमांक औरंगाबाद शहर
 द्वितीय क्रमांक बीड
 बास्केटबॉल महिला
 प्रथम क्रमांक औरंगाबाद शहर
 द्वितीय क्रमांक औरंगाबाद ग्रामीण
 याप्रमाणे जिल्हा निहाय  खेळाडूंनी प्रावीण्यासह विजेतेपद मिळवले आहे.

 मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी या समारोप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित  सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून विजेता संघाचे अभिनंदन केले आहे.
 या समारोप कार्यक्रम प्रसंगी   डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर,  . के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद , मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद,  नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक बीड,  अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद,  डॉ. अक्षय शिंदे, पोलीस अधीक्षक,जालना , . श्री. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांचे सह औरंगाबाद, जालना, बिड, उस्मानाबाद येथील  वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या